इन्फोसिस फिनॅकलची भारतातील अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांसाठी डिजिटल बँकिंग SaaS सेवा

 

कोल्हापूर  : इन्फोसिस फिनॅकल या एजव्हर्व सिस्टम या इन्फोसिसच्या संपूर्ण मालकीच्या उपकंपनीचा भाग असलेल्या कंपनीने आज आपल्या डिजिटल बँकिंग SaaS (सॉफ्टवेअर-अॅज-अ-सर्विस) सेवेची घोषणा केली. भारतीय अर्बन को ऑपरेटिव्ह बँकांना (यूसीबीज) आपला व्यवसाय आणि कार्यपद्धतींमध्ये आधुनिकता आणण्यासाठी पर्याय उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या सेवेची रचना करण्यात आली आहे. विद्या सहकारी बँकअर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, बरेली आणि झोरास्ट्रियन को-ऑपरेटिव्ह बँक या भारतातील तीन आघाडीच्या यूसीबीजनी खास यूसीबी विभागासाठी तयार करण्यात आलेल्या या व्यासपीठाचा अवलंबही सुरू केला आहे. सुयोग्य दरातील या SaaS सेवेमुळे या क्षेत्रातील आघाडीच्या सर्व फिनॅकल पर्यायांचा सर्वसमावेशक कार्यात्मक संच उपलब्ध होतो. त्याचप्रमाणे Best of Breed Software Solutions (BBSSL) अशा फिनॅकल व्यवसाय भागीदारांच्या मोफत सेवा आणि क्षमताही यात उपलब्ध असल्याने यूसीबीजना खर्च कमी करणे, कार्यात्मक क्षमता वाढवणे आणि जागतिक दर्जाचा ग्राहकानुभव देणे शक्य होते.

ठळक वैशिष्ट्ये :

  • सबस्क्रिप्शन पद्धतीने उपब्लध या एंड-टू-एंड डिजिटल बँकिंग पर्यायांमध्ये फिनॅकल कोअर बँकिंग आणि एसआयपीएलचे मोफत पर्याय तसेच एटीएम स्विच, मोबाइल बँकिंग, इंटरनेट बँकिंग असे अतिरिक्त पर्याय स्वीकारण्याचे पर्यायही यात आहेत.
  • एंड-टू-एंड व्यवस्थापित केलेल्या या सेवेत यूसीबीजना त्यांच्या तंत्रज्ञान बदलाच्या प्रक्रियेत खर्च करण्यासंदर्भातील या ओपेक्स मॉडेलमुळे यूसीबीजना फायदा होणार आहे. लक्षणीय प्रमाणात थेट गुंतवणूक करण्याऐवजी बँका ज्या सेवा वापरतील त्यासाठीच खर्च केला जाईल, याची खातरजमा यातून होणार आहे.फिनॅकलच्या इन-बिल्ट प्रोडक्ट फॅक्टरी आणि क्लाऊड मायग्रेशनच्या सहज चलनासह दमदार लोकलाइज्ड कार्यचलन आणि नियामक पालन आवश्यकता यामुळे यूसीबीजना आपल्या सदस्यांच्या वाढत्या गरजा पूर्ण करण्यासाठी वेगाने नाविन्यतेचा अवलंब करून उत्पादने आणि ऑन-डिमांड सेवांचा वापर सुरू करता येईल.बेस्ट ऑफ ब्रीड सॉफ्टवेअर सोल्युशन्स (बीबीएसएसएल) या फिनॅकलच्या विश्वासार्ह अमलबजावणी भागीदाराकडून SaaS उत्पादनांची वेगवान आणि परिणामकारक अमलबजावणी केली जाईल.

विद्या सहकारी बँक लि. आणि महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनचे अध्यक्ष आणि नॅशनल फेडरेशन ऑफ अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स अॅण्ड क्रेडिट सोसायटीज लि(NAFCUB) चे उपाध्यक्ष विद्याधर अनसकर म्हणाले, “अर्बन कोऑपरेटिव्ह बँक्स (यूसीबीज)मध्ये प्रचंड क्षमता आहेत ज्या विकसित करायला हव्यात. यूसीबींची शहरी आणि ग्रामीण जनतेतील भौगोलिक आणि प्रादेशिक व्याप्ती अतुलनीय आहे. ग्राहकांसोबत असलेले त्यांचे अप्रतिम बँकिंग संबंध तर निर्विवाद आहेत. विद्या बँकेत या संधीचा लाभ घेत आम्हाला आधुनिक तंत्रज्ञान व्यासपीठाला एक धोरणात्मक मार्ग म्हणून वापरत भविष्याच्या दिशेने मोठा पल्ला गाठण्यास आता आम्ही सज्ज आहोत. इन्फोसिस फिनॅकलसोबत आमच्या डिजिटल-फर्स्ट दृष्टिकोनाला पूर्णपणे अंगिकारण्यास आम्ही सज्ज आहोत आणि समुदायातील दमदार उपस्थितीसोबत तांत्रिक बळ, नाविन्यता, सुयोग्य संदर्भ आणि बँकिंग उत्पादने असा योग्य मेळ साधत आम्ही स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यास उत्सुक आहोत.”इन्फोसिस फिनॅकलचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि विक्री विभागाचे ग्लोबल हेड वेंकटरामण गोसावी म्हणाले, “दोन दशकांहून अधिक काळापासून फिनॅकल भारतातील वित्त संस्थांच्या बदलात्मक प्रवासात त्यांचा बळकट भागीदार राहिला आहे. आजघडीला, ‘न्यू नॉर्मल’ जगात ग्राहकांचे बदलते वर्तन, नवे चपळ स्पर्धक आणि बदलणारे नियम यामुळे यूसीबी परिसंस्थाही नवे रूप धारण करत आहे. नाविन्यतेवर सातत्याने भर देत देशातील यूसीबीजच्या प्रगतीच्या पुढील टप्प्याला आमच्या भागीदारांसोबत आमच्या सहज उपलब्ध SaaS उप्तादनांचे साह्य देताना आम्हाला आनंद होतो आहे. आमच्या बांधिलकीतील या नव्या टप्प्यामुळे यूसीबीजना कित्येक वर्षांपासून मिळवलेला ग्राहकांचा विश्वास यापुढेही कायम ठेवता येईल आणि भविष्यासाठी एक लवचिक संस्था यातून निर्माण करता येईल. ही प्रणाली वापरणाऱ्या पहिल्या काही वापरकर्त्यांचे म्हणजेच विद्या बँक, अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, बरेली आणि झोरास्ट्रियन को-ऑपरेटिव्ह बँकेचे फिनॅकलच्या साह्याने प्रगती करणाऱ्या यूसीबीज समुहामध्ये मी स्वागत करतो.”सारस्वत इन्फोटेक लि.चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि कंपनी सेक्रेटरी डॉदेवदत्त चंदगडकर म्हणाले, “बँकिंग तंत्रज्ञानातील बाजारपेठेतील आघाडीच्या इन्फोसिस फिनॅकलसोबत धोरणात्मक भागीदारीची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. प्रचंड स्पर्धा आणि नियामक आव्हानांच्या पार्श्वभूमीवर अत्याधुनिक तंत्रज्ञानात सातत्याने गुंतवणूक करणे कोऑपरेटिव्ह बँकांसाठी महत्त्वाचे आहे. व्यवसायाला आधुनिक आणि व्यापक करण्यासाठीचे हे SaaS आधारित, डिजिटल बदलात्मक पर्याय योग्य दरात उपलब्ध आहेत तसेच त्यामुळे त्यांच्या सदस्यांना जागतिक दर्जाचा बँकिंग अनुभव मिळतो. इन्फोसिस फिनॅकलच्या साथीने आम्ही यूसीबीजना त्यांच्या व्यवसायात बदल करत काळाच्या पुढे जाण्यास साह्य करू.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!