
कोल्हापूर/प्रतिनिधी :पूर्ण जगाने आणि आधुनिक वैद्यकीय उपचार प्रणालीने जवळ जवळ हात टेकलेले असताना नेहमीच्या वैद्यकीय उपचारांबरोबर आरोग्य निर्भर (ए.एन. २.०) हि मेडिकल न्यूट्रीशनथेरपी वापरल्यास रुग्ण लवकर बरे होण्याची शक्यता वाढते तसेच आजाराचा कालावधीही कमी होतो असे प्रतिपादन संकल्प ह्यूमन रिसोर्स डेव्हलोपमेंट कोर्पोरेशन लि.चे संचालक आणि सुप्रसिद्ध फॅमिली फिजिशियन डॉ. पी. एन. कदम यांनी केले.
” इम्म्युनोथेरपी” चा गेली १२ वर्ष करत असलेला अभ्यास आणि वैद्यकीय क्षेत्रातील ३५ वर्षाचा प्रदीर्घ अनुभव यातून त्यांनी तज्ञ सहकाऱ्यांसोबत “आरोग्यनिर्भर” या इम्म्युनिटी सिक्वेन्स ची निर्मिती केली आहे. यातील ए.एन. २.० हा कोविड १९ किंवा कोरोनाची लागण झालेली असताना द्यावयाचा “पूरक आहार औषधी” म्हणून कसा कार्य करतो त्याचे शास्त्रशुद्ध विवेचन त्यांनी दिले आहे. कोरोना विषाणूचा प्रभाव आणि प्रजनन वेगाने कमी होणे ऑक्सिजन पातळीमध्ये लक्षणीय वाढ होणे किंवा स्थिर होणे तसेच प्रचलित इंजेकशनच्या वापरामुळे होणारे ‘ऍसिडोसिस’ नियंत्रणात ठेवून गुंतागुंत कमी करणे असे सकारात्मक परिणाम करणारे नैसर्गिक घटक आणि क्लोरोलाइफ याविषयी माहिती घेउन सर्वच डॉक्टर्स आणि मोठ्या हॉस्पिटलनी याचा रुग्णांना लाभ करून द्यावा असे आवाहन संकल्पाच्या संचालिका डॉक्टर.अपूर्वा अहिरराव यांनी केले आहे.
एच .आर. सी. टी स्कोर आणि रुग्णाची ऑक्सिजनची पातळी यानुसार एक ‘ प्रोटोकॉल’ तयार करण्यात “संकल्प “टीमला यश आले असून “सायटोकाईन ” स्टॉर्म” मध्ये रुग्ण जाऊ न देणे आणि शरीरद्रव्यांना अल्कलाईन वातावरणात ठेवल्यास चयापचय क्रिया (मेटाबॉलिझम) प्रतिकार शक्तीस मदत करते या शास्त्रीय तत्वावर कोणत्याही प्रकारची घातक रसायने स्टिरॉईड्स न वापरता निसर्गातील सूक्ष्म आहार तत्वाचा औषधी म्हणून प्रभावी वापर करणे शक्य आहे हे डॉक्टर. कदम यांनी आवर्जून सांगितले.
क्लिनिकल ट्रायल्स साठी अनेक नामांकित हॉस्पिटल्स आणि शासन दरबारी प्रयत्न करून झाल्यानंतर “आरोग्य निर्भर” हा प्रयोग सिद्ध करण्यासाठी मूळचे कोल्हापूरचे पण संशोधनासाठी पुण्यात स्थायिक झालेल्या डॉ.कदम यांनी बारामतीमध्ये कोविडच्या दुसऱ्या लाटेत ७० बेडचे रुग्णालय उभे केले. ३० ऑक्सिजन बेड, ५ बायपॅप आणि २ व्हेंटीलेटरच्या सहाय्याने सहा तज्ञ डॉ. च्या मार्गदर्शनाखाली या क्लिनिकल ट्रायल्स स्वतः घेतल्या आणि त्या निश्चितपणे यशस्वी झाल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक १०० अडमिट रुग्णामागे १० ते ४० एवढ्या प्रचंड प्रमाणात मृत्यू दर असताना बारामतीतील या कोविड केअर हॉस्पिटलमधील मृत्यू दर ४ पेक्षाही कमी आहे हे विशेष सांगली, कोल्हापूर, येथील सध्याची परिस्थिती तसेच पुढे धोका असलेली ” तिसरी लाट” याचा विचार करता संपूर्ण महाराष्ट्रात “आरोग्य निर्भर ” या संकल्पनेचा प्रचार आणि प्रसार करणार असल्याचे संशोधन विभाग प्रमुख शर्वरी डोंबे आणि बारामती आरोग्य निर्भर हॉस्पिटलचे मॅनेजर रघुवीर सिंग राठोड यांनी सांगितले.भविष्यात कोरोना संदर्भात व्यक्तीगत आणि सामुदायिक समुपदेशनासाठी ही कक्ष ही संकल्प वतीने सुरु केला जाणार आहे.
Leave a Reply