
कोल्हापूर : दिनांक १८ रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या दारामध्ये जोरदार निदर्शने करण्यात आली होती शाळांच्या फी वाढीबाबत शिक्षण उपसंचालक निरुत्तर झाले होते या आंदोलनाला उत्तर देताना शिक्षण उपसंचालकांनी शिक्षण अधिकारी यांच्यासोबत तातडीने मीटिंग घेण्याचे आश्वासन भारतीय जनता पार्टीला दिले होते यासंदर्भातील बैठक आज शिक्षण उपसंचालक कार्यालय येथे संपन्न झाली भारतीय जनता पार्टीच्या वतीने सरचिटणीस विजय जाधव हेमंत आराध्ये गणेश देसाई यांनी बैठकीमध्ये सहभाग घेतला.मिटिंगच्या सुरवातीला शिक्षण उपसंचालक सोनावणे यांनी सुरु असलेल्या शैक्षणिक फी विषयाबाबत सर्व शिक्षण अधिकारी यांच्याकडून आढावा घेतला तसेच भाजपाच्या निवेदना नंतर ऑनलाईन मिटिंग व नोटीसीद्वारे शाळांना याबाबत सूचना केल्याचे सांगितले.
Leave a Reply