
कोल्हापूर : संकलन विभाग कामकाज आढाव मिटींग मध्ये बोलताना चेअरमन विश्वास पाटील यांनी गोकुळने नेहमीच गुणवत्तेला महत्व दिलेले आहे. म्हणूनच बाजारात गोकुळच्या दूध व दुग्धजन्य पदार्थांना अधिक मागणी आहे. तसेच संघाचे महालक्ष्मी पशुखाद्य उत्पादित केले जाते, त्याबरोबर जनावरांना त्यांच्या शरीर पोषणा बरोबर दूध वाढीसाठी कारखान्यामध्ये टी.एम.आर. ब्लॉक, फर्टीमिन प्लस, सिल्वर रेशन पॅलेट व लहान वासरांसाठी मिल्क रिप्लेसर, काफ स्टार्टर व फिडींग पॅकेज उत्पादित केले जाते. या सर्व उत्पादनांची गुणवत्ता राखण्यासाठी संघाने ISO बरोबर BIS स्टँडर्डसाठी नोदंणी केली असून, यापुढे चांगल्या गुणवत्तेचे पशुखाद्य गोकुळच्या दूध उत्पादकांना त्यांच्या गाई व म्हैशींसाठी उपलब्ध केले जाईल. व गोकुळ मुंबर्इ, पुणे, तसेच महाराष्ट्रातील इतर बाजारपेठेत म्हैस दूधासाठी प्रसिध्द आहे. भविष्यात जास्तीत जास्त म्हैशीच्या दूध उत्पादनाचा टप्पा ओलांडण्यासाठी गोकुळच्या व्यवस्थापनाने विशेष खबरदारी घेतली पाहिजे . म्हैस दूध उत्पादन वाढीसाठी दूध उत्पादकांना विविध प्रकारच्या सेवा सुविधा देण्यावर भर दिला पहिजे. गोकुळच्या कार्यक्षेत्रात कार्यरत असलेले गोकुळचे विस्तार सुपरवायझर यांनी संकलन वाढीशिवाय वर्षभरात १,०००लिटरने दूधाची वाढ त्यांच्या नियंत्रणाखाली असणा-या दूध संस्थेमधून झाली पाहिजे असे उद्दिष्ट विस्तार सुपरवायझरना घालून दिलेले आहे. तसेच वीस लाख लिटर दूधाचे संकलन पूर्ण करण्यासाठी संघाच्या सर्व विभागा मार्फत नियोजन करावे अशा सुचना सबंधीत विभागाना दिल्या.
यावेळी कोल्हापूर विभाग, गडहिंग्लज चिलिंग सेंटर, बिद्री चिलिंग सेंटर उदगाव सॅटेलाईट डेअरी, गोगवे चिलिंग सेंटर, तावरेवाडी चिलिंग सेंटर या सर्व सेंटरचे सुपरवायझर उपस्थित होते.त्यावेळी विभाग वाईज आढावा घेण्यात आला.
पुढे बोलताना चेअरमन श्री. पाटील यांनी महालक्ष्मी पशुखाद्य हे गुणवत्तेच्या बाबतीत नंबर एक चे पशूखाद्य आहे असे एन.डी.डी.बी ने गौरवले असून त्याचा जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी वापर करावा व तसेच संघाच्या दुग्धजन्य पदार्थांची विक्री वाढावी यासाठी विस्तार सुपरवायझरानी सबंधीत मार्गावरती वर्षामध्ये संघाच्या किमान पाच शॉपी काढाव्यात अशा सुचना देण्यात आल्या.
यावेळी गोकुळच्या जेष्ठ संचालक अरुण डोंगळे व सर्व संचालकांनी दूध उत्पादन वाढीबाबत उपस्थितांना मार्गदर्शन व सूचना केल्या. या मिटिंगची सुरूवात संकलनचे व्यवस्थापक शरद तुरंबेकर यांच्या प्रस्ताविकाने होऊन आभार सहा. व्यवस्थापक डी. डी. पाटील यांनी मानले. या सभेमध्ये म्हैस दूध उत्पादन वाढ याचबरोबर गुणवत्ता सुधारणा याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.याप्रसंगी गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील (आबाजी), माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरूण डोंगळे, अजित नरके, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड(बाळ), बाबासाहेब चौगले, संभाजी पाटील(एस.आर.), प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, बयाजी शेळके, बाळासो खाडे, अंबरिषसिंह घाटगे, चेतन नरके. संचालिका अंजना रेडेकर, शौमिका महाडिक, कार्यकारी संचालक डी.व्ही. घाणेकर, तसेच अधिकारी उपस्थित होते.
Leave a Reply