विविध रोगावरील लसीकरण व आधुनिक तंत्रज्ञानाने दूध उत्‍पादनामध्‍ये वाढ करवी:अध्यक्ष विश्वास पाटील

 

कोल्‍हापूर : पशुसंवर्धन विभाग कामकाज आढाव मिटींग मध्‍ये बोलताना चेअरमन विश्‍वास पाटील यांनी संघाकडून देण्‍यात येणा-या संघ सेवा-सुविधा मध्‍ये  पशुवैद्यकीय सेवा ही अतिशय महत्‍वाची सेवा आहे. तसेच दूध वाढीसाठी व जनावराचा भाकड काळ कमी करण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी उत्पादकाच्या गोठ्यावर जाऊन त्‍यांना लागेल ते मार्गदर्शन व पशुवैद्यकीय सेवा सुविधा द्याव्यात. सध्या थायलेरीयससिस (गोचिड ताप) हा आजरा जनावरान मध्ये जास्त प्रमाणात दिसत आहे.  याकरिता रक्षाव्‍हॅक- टी ही लस संघाने उपलब्‍ध केली आहे. या  लसीचे ल‍सीकरण जास्त प्रमाणावर करणे गरजेचे आहे.  तसेच आपण  दर वर्षी पावसाळा सुरू होण्‍यापूर्वी साथीच्‍या रोगांचा प्रदुर्भाव जनावरांना होऊ नये याकरिता संघा मार्फत मोफत लसीकरण केले जाते. त्यामध्ये जंत निर्मुलन , लाळखुरकत लसीकरण केले जाते. लाळखूरकत लसीकरण न केल्यामुळे जनावरे सहजपणे या आजाराला बळी पडतात. परीणामी अशी जनावरे कायम स्‍वरूपी निकामी होतात अथवा त्‍यांच्‍या  दूध उत्‍पादन व प्रजनन शक्‍तीवर मोठा  परीणाम होतो. त्‍यामूळे संघाच्‍या पशुवैद्यकिय अधिका-यानी  शंभर टक्‍के जनावरांचे लसीकरण करावे असा सुचना दिल्‍या.

कृत्रिम रेतनाद्वारे जास्तीत जास्त मादी वासरेच जन्मास येऊन दूध उत्पादन वाढावे व दूध उत्पादकास आर्थिक फायदा व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र शासनामार्फत ९० टक्के मादी वासरेच जन्मास येतील अशा  लिंगविनिश्चित केलेल्या वीर्यामात्रा गोकुळ दूध संघामार्फत लवकरच उपलब्ध होतील असे अरुण डोंगळे यांनी सांगितले.

यावेळी सर्व संचालकांनी पशुवैद्यकीय सेवा बद्दल उपस्थितांना सूचना केल्या. या मिटिंगची सुरूवात पशुसंवर्धनचे व्‍यवस्‍थापक डॉ. यु.व्‍ही. मोगले यांच्‍या प्रस्‍ताविकाने होऊन आभार सहा. व्‍यवस्‍थापक डॉ. ए.व्‍ही. जोशी यांनी मानले. या मिटिंग मध्ये म्‍हैस दूध उत्‍पादन वाढ याचबरोबर गुणवत्‍ता सुधारणा व पशुसंवर्धन विभागवाईज सविस्‍तर चर्चा करण्‍यात आली.  याप्रसंगी गोकुळचे चेअरमन विश्‍वास पाटील (आबाजी), माजी चेअरमन व जेष्‍ठ संचालक अरूण डोंगळे, शशिकांत पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड(बाळ), बाबासाहेब चौगले, संभाजी पाटील(एस.आर.), प्रकाश पाटील,अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, संचालिका अंजना रेडेकर,कार्यकारी संचालक डी.व्‍ही. घाणेकर, तसेच पशुसंवर्धन विभागाकडील डॉक्टर,अधिकारी व कर्मचारी उ‍पस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!