
नवी दिल्ली : अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नोकरदारांना दिलासा दिलाय. बजेटमध्ये इन्कम टॅक्समध्ये कोणतीही वाढ केली नाही. त्यामुळे इन्कम टॅक्स स्लॅब जैसे थे आहे. प्राप्तिकर कलम 87 ए नुसार पाच लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणार्यांना करामध्ये 3000 हजारांची सवलत देण्यात आलीये. त्याचबरोबर करमुक्त घरभाड्याची मर्यादा 24 हजारांवरून 60 हजार रुपये करआकारणी करण्यात आली देशांतर्गंत अन्न प्रक्रिया उद्योगात एफडीआयसाठी पूर्णतः खुलं करण्यात आलं आहे. त्यामुळे या क्षेत्रात यापुढे 100 टक्के एफडीआयला परवानगी देण्यात आली आहे. यावेळी बोलताना त्यांनी, येत्या 5 वर्षांत शेतकर्यांचं उत्पन्न दुप्पटीने वाढणार असल्याचा विश्वासही व्यक्त केला आहे. कृषी, ग्रामीण क्षेत्रसाठीअर्थ संकल्पात ग्रामीण भागातील लोकांसाठी सुविधा पुरविण्यावर जोर
शेतकर्यांच्या कल्याणकारी योजनांसाठी 35,984 कोटींची तरतूद
5 वर्षांत शेतकर्यांचे उत्पन्न दुप्पट करणार
सॉईल हेल्थ कार्ड योजना प्रत्येक शेतकर्यापर्यंत
23 नवे सिंचन प्रकल्प पूर्ण करणार
सिंचन प्रकल्पांसाठी 17 हजार कोटींची तरतूद
5 लाख एकरवर सेंद्रीय शेतीचं उद्दिष्ट असून या शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी 412 कोटींची तरतूद
28.5 लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणणार
मनेरगाअंतर्गत 5 लाख नवीन शेततळी बांधणार
डाळींचं उत्पादन वाढवण्यासाठी 500 कोटींची तरतूद
शेतकर्यांसाठी 5 वर्षात 9 लाख कोटी रुपयांचे कर्ज उपलब्ध करणार
भूजल संशोधनासाठी 6 हजार कोटींची तरतूद
अन्न प्रक्रिया उद्योगासाठी 100 टक्के एफडीआय दूध उत्पादन वाढवण्यासाठी 4 नवीन दूधप्रकल्प सुरु करणार
शेतकर्यांसाठी 4 नव्या विमा योजना, यासाठी 5500 कोटींची तरतूद
शेतकर्यांवर व्याजापोटी 15 हजार कोटींची सूट
1 मे 2018 पर्यंत देशातल्या सर्व गावांत वीज पोचवणार
ग्रामीण भागातल्या विद्युतीकरणासाठी 8 हजार 500 कोटींची तरतूद
ग्रामीण भागासाठी डिजीटल साक्षरता योजना सुरू करणार
पीक विमा योजनेसाठी साडेपाच हजार कोटी
ऑर्गेनिक फार्मिंगसाठी 2 नव्या योजना
पंतप्रधान सडक योजनेसाठी 19 हजार कोटींची तरतूद
ग्रामीण भागात विजेसाठी 8500 कोटींची तरतूद
ग्रामीण भारताच्या विकासासाठी 87,769 कोटींची तरतूद. इन्कम टॅक्समध्ये कोणताही वाढ न करता सर्व करांमध्ये 0.5 टक्के वाढ केली आहे. त्यामुळे मॉलमध्ये खरेदी असो अथवा हॉटेलमध्ये जेवण आता सर्वच खर्चावर 0.5 टक्के कर द्यावा लागणा आहे. तसंच दरवर्षीप्रमाणे महागड्या गाड्या, बिडी वगळता तंबाखूजन्य पदार्थ, चामड्याच्या वस्तू महाग झाल्या आहे. त्याचबरोबर सोनं,हिरे, दागिने, ब्रँडेड कपडे महागले आहे. तर छोटे घरं खरेदी करतांना आयकरात सूट देण्यात आलीये. तसंच जिल्ह्यास्तरावर प्रत्येक हॉस्पिटलमध्ये डायलेसिसचे यंत्र लावण्यासाठी आयातकर माफ करण्यात आलाय.
हे महागणार
गाड्या ब्रँडेड कपडे लेदर उत्पादनं सोनं,हिर्यांचे दागिने तंबाखू, सिगारेट, गुटखा हॉटेलिंग विमा पॉलिसी दगडी कोळसाडेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड ट्राझांक्शनसिलबंद पाण्याची बॉटल मोबाईल बील सिमेंट लेदर बुट – चप्पल केबल सेवाविमान प्रवास रेल्वे तिकीटसिनेमा तिकीट
हे होणार स्वस्त
छोट्या घरांसाठी सवलतअपंगांसाठीचे साहित्य स्वस्त एलईडी टीव्हीइलेक्ट्रिककारओव्हन मोबाईलटॅबलेट औषधी ऍम्बुलन्स सर्व्हिस
Leave a Reply