
कोल्हापूर : जालनावाला स्पोर्ट्स ट्रेनिंग अँड रिसर्च सेंटर(जेएसटीआरसीच्या) वतीने तायक्वांदो स्पायरिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.जैन बोर्डिंग येथे संपन्न झालेल्या या स्पर्धेत कोल्हापूरसह मुंबई आणि कराड येथून स्पर्धक आले होते.स्पर्धेचे उद्घाटन नगरसेवक अशोक जाधव,बी न्यूजचे मुख्य बातमीदार अमोल माळी,प्रकाश भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. जेएसटीआरसीचे प्रशिक्षक अमोल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेस प्रारंभ झाला.खेळ हा मुलांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे.तायक्वांदो सारख्या क्रिडा प्रकारांमुळे स्वसरंक्षण करण्यासाठी आत्मविश्वास वाढतो.अशा प्रकारच्या स्पर्धा आयोजित करणे गरजेचे असते असे प्रतिपादन प्रमुख पाहुण्यांनी केले.स्पर्धेचे हे चौथे वर्ष असून कोल्हापूरला स्पर्धेत विजेतेपद मिळाले.तर दुसऱ्या स्थानावर कराडच्या तायक्वांदो असोशिएशनच्या खेळाडूंनी तर तिसरा क्रमांक मुंबईच्या वेदांत तायक्वांदो अकादमीच्या खेळाडूंनी पटकावला.
विजेत्यांमध्ये सुयोग चौगुले,शौर्य सरनोबत,महमद साद मोमीन,ध्येय वसा,स्वप्नील देशमाने,पृथ्वीराज अवघडे,जय दप्तरदार,मानस चौगुले,आदित्य कांझर,श्रेयश जाधव,उदयराज विभूते,राजवर्धन देसाई,शिवराज शिंदे,आकाश सणगर,विवेक माजगावकर,ऋषिकेश इटगी सहाना बंदी,गौरी सिंग,नाईसा गोवावाला,स्वरांगी जाधव,यशवी वसा,निकिता पटेल जान्हवी माने,अक्षता सावंत,केत्री इनामदार,प्रिशा खाचरा यांना सुवर्ण पदक,
व्यंकटेश पै,विश्वजित पाटील,वेदांत शिर्के,शाश्वत पाटील,अर्थ शितोळे,भारत वाज,अमेय चव्हाण,ऋषिकेश तिबिले,प्रणित माने,जयकुमार करदाणी,ओमकार चोडणकर,रोहीत खुडे,गणेश सुतार,शौर्या शेटये,अक्षता इनामदार,रसी मुंगेकर,जिवल फडणीस,प्रिशा शेटये,तन्वी कोरडे,दृष्टी शेटगे,राजलक्ष्मी अवघडे,वैष्णवी देशपांडे,आर्या खंडवणी यांना रौप्य पदक
प्रथमेश कणसे,विहान पटेल,व्यंकटेश पवार.अन्वयश माने,ज्योतिरादित्य क्षीरसागर,अनिमिश घोडे,अथर्व माळकर,आयुष कदम,भारत शिंदे,भावेश चौधरी,प्रतिक सावंत,रोहन पिसाळ,साहिल दळवी,अंकुश नागदेव,जिनय मेहता,शिवम पाटील,अनन्या चौगुले,समृद्धी माळकर,निधी पाटील,स्नेहा दानोळीकर,जिगीशा वातकर,अदिती शिंदे,मृणाली माने यांनी कास्यपदक पटकावले.
प्रशांत शेटे,सुरज रजपूत,सचिन पवार,वीरेंद्र भागोजी आणि रसिका कोठीवाले यांनी पंच म्हणून काम पाहिले.आशिष नागदेव आणि अमोल भोसले यांनी आभार मानले
Leave a Reply