अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते उघडणार केशवराव भोसले नाट्यगृहाचा पडदा

 

20151103_205421-BlendCollageकोल्हापूर :कोल्हापूर महानगरपालिकेचे संगीतसुर्य केशवराव भोसले नाटयगृह व राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदानाच्या नुतनीकरणानंतर उद्घाटन दि.6 मार्च 2016 रोजी होणार आहे. या उद्घाटन कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत महापौर सौ.अश्विनी रामाणे यांच्या अध्यक्षतेखाली आज पदाधिकारी, नगरसेवक व अधिकारी यांची संयुक्त बैठक छ.ताराराणी सभागृहामध्ये आयोजीत करण्यात आली होती.
    केशवराव भोसले नाटयगृहाचे व्यवस्थापक विजय वणकुद्रे यांनी नाटयगृह व कुस्ती मैदानाच्या उद्घाटन कार्यक्रमाची रुपरेषा सांगीतली. यामध्ये दि.6 मार्च 2016 रोजी सकाळी 9.00 वाजता प्रसिध्द सिने अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन करणेत येईल. तसेच दि.6 ते 9 मार्च 2016 पर्यत चार दिवस भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध पारंपारिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात येणार असल्याची माहिती दिली.
    महापौर सौ.अश्विनी रामाणे यांनी कार्यक्रम अधिकाधिक चांगला होण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी योग्य नियोजन करणेच्या सुचना यावेळी दिल्या.
    महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक संचनालयमार्फत प्राप्त झालेल्या रु.10 कोटी निधीमधून केशवराव भोसले नाटयगृह व खासबाग कुस्ती मैदानाचे नुतनीकरण व सुशोभिकरणाचे काम पुर्ण झाले आहे. 
    या बैठकीस उपमहापौर सौ.शमा मुल्ला, स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव, महिला व बालकल्याण समिती सभापती सौ.वृषाली कदम, सभागृहनेता प्रविण केसरकर, गटनेता शारंगधर देशमुख, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, सहाय्यक आयुक्त उमेश रणदिवे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, उपशहर अभियंता एस.के.पाटील, माजी नगरसेवक मधुकर रामाणे, दुर्वास कदम आदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!