
कोल्हापूर:इतर राज्यातील मंदिरे भाविकांसाठी ली झाली आहेत, मग महाराष्ट्रातील मंदिरे खुली करण्यास परवानगी का दिली जात नाही, असा सवाल उपस्थित करत, भाजपचे प्रदेश प्रवक्ते धनंजय महाडिक यांंच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात आले. मंदिरे खुली करण्याची मागणी करत आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसर दणाणून सोडला. त्यानंतर महाडिक यांच्यासह शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची भेट घेऊन निवेदन दिले. महाविकास आघाडी सरकारने मंदिरे खुली करण्याची परवानगी दिली नाही तर आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. आंदोलनात विठ्ठल पाटील, भगवान काटे, हंबीरराव पाटील, डॉ. आनंद गुरव, दत्तात्रय आवळे, गजेंद्र हेगडे, महेश मोरे, अमित गाठ, सचिन गंडमाळे, आझम जमादार यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
Leave a Reply