
कोल्हापूर/प्रतिनिधी: सहकार क्षेत्रात दूध संकलनामध्ये गोकूळ राज्यात एक नंबर तर देशात सात नंबर वर असून लिक्वीङ मिल्क मार्केटिंगमध्ये राज्यात एक नंबरचा तर देशात दोन नंबर चा संघ आहे. म्हणूनच गोकूळचे नाव संपूर्ण भारतात आदर्श संस्था म्हणून घेतलेत्र जाते. संघाची वार्षिक उलाढाल 2551 कोटी इतकी आहे. गोकूळ ने इतर दूध संघाच्या तूलनेत उत्पादकानां जादा दर देण्याचे सातत्य राखले आहे. शासनापेक्षा संघाचा प्रत्यक्ष दर म्हॅस दूधास प्रतिलिटर दोन रूपये साठ पैसे इतका जादा दिला जातो.अशी माहीती कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ ( गोकूळ) चे अध्यक्ष विश्वासराव नारायण पाटील यांनी दिली.
ते गोकूळ दूध संघाच्या 59 व्या आॅनलाईन वार्षिक सभेत ते बोलत होते. प्रारंभी अहवाल सालात जे थोर “नेते “मंत्री”आमदार”जवान”उद्योजक”साहित्यिक””तसेच दूध उत्पादक संस्थेचे दिवंगत झालेत त्यानां श्रद्धांजली वाहीण्यात आली.
ते पूढे म्हणाले”संघाची वार्षिक उलाढाल 2551 कोटी इतकी आहे.अहवाल सालात संघाच्या कर्मचार्यानां 25% बोनस दिला जाणार आहे. त्याची रक्कम 25% प्रमाणे 17 कोटी 38 लाख आहे. अहवाल सालात संघाची सरासरी दूध खरेदी दर म्हॅस दूधासाठी 48 रूपये 47 पॅसे तर दूधासाठी 30 रूपये 87 पॅसे इतका आहे. मूंबई मार्केटमध्ये गोकूळ सिलेक्ट या नावाने टेट्रापॅक टोन्ङ दूधाची विक्री सूरू केली आहे.आज अखेर संघाची एकूण दूध विक्री सरासरी 12 लाख 50 हजार ते 13 लाख 50 हजार लिटर पर्यंत आहे. सध्या टेट्रापॅक मधील दूधास मूंबई””ठाणे”पालघर परिसरातील उच्चभ्र ग्राहकांकङून चांगली मागणी आहे. थोङ्याच दिवसात गोकूळ संघाच्या माध्यमातून लस्सी””सूगंधी दूध”व ताक टेट्राॅपॅकमध्ये पॅकिंग करून लवकरच मार्केटमध्ये विक्रीसाठी उपल्बध करून देणार आहे. तसेच बासूंदीचे उत्पादन लवकरच सूरू करून मार्केटमध्ये पाटविणार असल्याचे सांगितले. कोल्हापूर”पूणे”मूंबई विभागामध्ये ग्राहकानां थेट गोकूळ ब्रॅंङचे दूध व दूग्धपदार्थ उपल्बध करून देण्यासाठी ठिकठिकाणी गोकूळची शाॅपी उभ्या केल्या जाणार आहेत.भारतीय र्नोदल सेना( नेव्ही) गोवा व मूंबई तसेच नऊ टी. ए.बटालियन कोल्हापूर यानां प्रमाणित दूध व टेबल बटर पूरवठ्याबाबतचे टेंङर संघालामिळाले आहे. अहवाल सालात संघाने केंद्र व राज्य शासनाने लागू केलेल्या कोरोना संसर्गाच्या निर्बंधाबाबतच्या सर्व नियमाचे पालन करून ग्राहकानां थेट दूध व दूग्धपदार्थ उपल्बध करून दिले आहेत.सामाजिक बांधिलकीची जाणिव ठेवून संघामार्फत वूध्दाश्रम””अनाथाश्रम”अंध मूले”अपंग व्यक्ती यानां वर्षभर मोफत दूध पूरवठा केला जातो.संघास सलग पाचव्या वर्षी ” ऊर्जा “बचतीचा प्रथम पूरस्कार प्राप्त झाल्याचे ही गोकूळ’चे अध्यक्ष विश्वासराव नारायन पाटील यांनी सांगितले
Leave a Reply