
कोल्हापूर: राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य,शांत मितभाषी आणि प्रामाणिक लोकप्रतिनिधी असे कोल्हापूर उत्तर विधानसभा आमदार चंद्रकांत जाधव आण्णा यांचे दुःखद निधन झाले. हैद्राबाद येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला.जिंदादील व्यक्तीमत्व , खिलाडू वृत्तीचे खेळाडू , यशस्वी उद्योजक , निस्वार्थ समाजसेवक , स्वच्छ व प्रामाणिक राजकारणी , कोल्हापूर शहरात सर्वांनाच आपलेसे वाटणारे सर्वांच्या हक्काचे “आण्णा” आज आपल्यातून निघून गेले .
विधानसभा सदस्य आमदार चंद्रकांत जाधव यांची एक्झिट मनाला चटका लावणारी आहे.फुटबॉलवर विशेष प्रेम असणारे हे व्यक्तिमत्त्व सतत प्रसिद्धीपासून कोसोदूर राहत आले.त्यांच्या जाण्याने एक उत्कृष्ट राजकारणी,कसदार खेळाडू व यशस्वी उद्योजक आपण गमावला.
Leave a Reply