मावशीच्या वाढदिवशी श्रद्धा कपूरची ‘ही’ घोषणा चर्चेत

 

श्रद्धा कपूर ही नव्या पिढीची ग्लॅमरस आणि लोकप्रिय अभिनेत्री. वैविध्यपूर्ण भूमिकांमुळे चर्चेत असणारी श्रद्धा सोशल मीडियावरही कायम सक्रीय असते. आताही श्रद्धाने शेअर केलेल्या एका पोस्टरची चर्चा सुरू आहे.
मावशी पद्मिनी कोल्हापुरेच्या वाढदिवसानिमित्त श्रद्धाने एक खास घोषणा केली आहे. सोबतच त्यासंबंधीचे पोस्टरही तिने ‘कू’वर शेअर केले आहे. यात पद्मिनी कोल्हापुरे दिसत आहेत. मावशीच्या गोड आवाजातले गाणे चाहत्यांना लवकरच ऐकायला मिळेल असे श्रद्धाने म्हटले आहे. ‘प्रेम रोग’ सिनेमाचे ‘ये गलियां ये चौबारा’ हे सदाबहार गाणे सगळ्यांच्या आजही आठवणीत आहे. याच गाण्याला नवा साज चढवत पद्मिनी कोल्हापुरे ते गाणार आहेत.
या गाण्याच्या व्हीडिओत पद्मिनी कोल्हापुरेसह अमी मिसोबा, अमायरा भाटिया, प्रियांक शर्मा आणि पारस मेहता दिसणार आहेत. या गाण्याचे संगीत दिग्दर्शन दिलशाद शब्बीर शेख यांनी केले असून रंजू वर्गीस हे क्रिएटिव्ह डायरेक्टर आहेत.
कू करताना श्रद्धाने लिहिले आहे, ‘आयकॉनिक गाणं आता माझी प्रिय मावशी आपल्या गोड आवाजात गाणार आहे. हरेक आईच्या काळजाला हात घालणारं गाणं! एक मुलगी आपल्या आईच्या कुशीतून उतरून मोठी होऊच शकते मात्र ती आईच्या प्रेमाहून कायम लहानच राहते… ” श्रद्धाच्या या ‘कू’ला अनेकांनी लाईक करत विविध कमेंट्सही नोंदवल्या आहेत. 

 “https://www.kooapp.com/koo/shraddhakapoor/444118de-a8be-44c3-88ab-22e4ebcce399

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!