
कोल्हापूर /प्रतिनिधी: इंडियन मेडीकल असोसिएशन शाखा कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचा
मुंबई येथे झालेल्या ‘ मास्टाकॉन’ या वैद्यकीय परिषदेत विशेष सन्मान करण्यात आला. कोल्हापुरात वुमन डॉक्टर्स विंगच्या ‘महाईव्हकॉन’ या वैद्यकीय परिषदेच्या उत्कृष्ट आयोजनाबद्दल तसेच इंडियन मेडिकल असोसिएशन शाखा कोल्हापूरच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल असोसिएशनला मानपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. कोल्हापूर शाखेच्या अध्यक्षा तसेच महाराष्ट्र राज्याच्या वुमन डॉक्टर्स विंगच्या अध्यक्षा डॉ. आशा जाधव,संयोजक सचिव डॉ.अशोक जाधव आणि उपाध्यक्षा डॉ. गीता पिल्लाई यांनी हा सन्मान स्विकारला. ‘वैद्यकीय स्त्री आज आणि उद्या’ या संकल्पनेवर आधारित कोल्हापुरात या परिषदेचे अतिशय कमी वेळेत उत्कृष्टरित्या आयोजन करण्यात आले होते. याला महाराष्ट्रातून अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला होता. कोल्हापूर मेडिकल असोसिएशन व वुमन डॉक्टर्स विंग यापुढेही वैद्यकीय क्षेत्रात चांगली कामगिरी करत राहील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.यावेळी आयएमए महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. रामकृष्ण लोंढे, सचिव पंकज बांदारकर, खजनिस डॉ. राजीव अग्रवाल,अध्यक्ष डॉ.सुहास पिंगळे,आयएमएचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयालाल,आयएमएचे राष्ट्रीय सचिव डॉ.जयेश लेले आदि उपस्थित होते.
Leave a Reply