
अभिनेता, लेखक, संगीतकार आणि कवी अशी वैविध्यपूर्ण ओळख असलेले कलावंत पीयुष मिश्रा आता दाखल झाले आहेत ‘कू’वर! भारताचा बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग मंच असलेल्या ‘कू’वर मिश्रा चाहत्यांसोबत थेट संवाद करतील. सोबतच ते त्यांच्या कविता, गाणी, विचार शेअर करत ‘कू’वर अनोखे रंग भरतील.
त्यांनी त्यांच्या @itspiyushmishra या हँडलवरून हिंदीमध्ये पोस्ट केली आहे.
‘थोड़ा नजारा, चटपट बाते
यही कहानी, आते जाते
थोड़ी हसी हैं, थोड़े लतीफे
थोड़ा तराना, चटपट बातें…
बस यारो यहीं बाते, कहानियां, तराने और लतीफे अब KOO पर करेंगे।’थोड़ा नजारा, चटपट बाते यही कहानी, आते जाते थोड़ी हसी हैं, थोड़े लतीफे थोड़ा तराना, चटपट बातें… बस यारो यहीं बाते, कहानियां, तराने और लतीफे अब KOO पर करेंगे
‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’ (NSD) चे पदवीधर असलेल्या मिश्रा यांनी त्यांच्या कारकिर्दीला थिएटर अभिनेता म्हणून सुरुवात केली. 1998 मध्ये मणिरत्नम यांच्या ‘दिल से’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ‘द लिजेंड ऑफ भगतसिंग’, ‘मकबूल’, ‘गुलाल’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमधून त्यांनी आपला ठसा उमटवला आहे.
मंचावर पीयुष मिश्रा यांचे स्वागत करताना, ‘कू’च्या प्रवक्त्याने सांगितले, “ज्येष्ठ अभिनेते, लेखक, कवी आणि संगीतकार पीयुष मिश्रा आमच्या मंचावर आल्याने आनंद होतो आहे. हा असा मंच आहे जिथे व्यक्ती आपल्या मातृभाषेमधून व्यक्त होऊ शकते. आमचा 50 टक्क्यांहून अधिक युजर हिंदीमध्ये आहे. हिंदी भाषिकांमध्ये कविता आणि साहित्याचा चाहतावर्ग मोठा आहे. पीयुषजी त्यांच्या साहित्यिक प्रतिभेसाठी ओळखले जातात. आम्हाला खात्री आहे, की ते त्यांच्या चाहत्यांशी जोडून घेण्यास आमच्या व्यासपीठाचा उपयोग करतीलच. सोबतच भारतातील उद्योन्मुख अभिनेते आणि कलाकारांसाठीही ते प्रेरणादायी ठरतील.”
आता ‘कू’ भारतीयांना त्यांच्या मातृभाषेत व्यक्त होण्यासाठी सक्षम करणारा सर्वसमावेशक मंच बनला आहे. अनुपम खेर, कंगना रणौत, क्रिती सेनॉन, श्रद्धा कपूर, टायगर श्रॉफ अशी लोकप्रिय व्यक्तिमत्वं ‘कू’ अॅपचा चेहरा बनली आहेत. हे कलावंत विविध स्थानिक भाषांमधून आपल्या चाहत्यांशी थेट संवाद करत असतात.
काय आहे कू?
‘कू’ची स्थापना मार्च 2020 मध्ये भारतीय भाषांमध्ये बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म म्हणून झाली. अनेक भारतीय भाषांमध्ये उपलब्ध, ‘कू’ विविध क्षेत्रातील भारतीय लोकांना त्यांच्या मातृभाषेत व्यक्त होण्याचा सोपा मार्ग मिळवून देते. ज्या देशातील फक्त १०% लोक इंग्रजी बोलतात, तिथे अशा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची खूप गरज आहे जे भारतीय युजर्सना त्यांच्या भाषेतला अस्सल अनुभव देऊ शकेल, त्यांना एकमेकांशी जोडून ठेवेल. भारतीय भाषांमध्ये संवाद साधायला प्राधान्य देणाऱ्या भारतीयांच्या आवाजासाठी ‘कू’ एक मंच मिळवून देतो.
Leave a Reply