
कोल्हापूर :कोल्हापूर जिल्हा सह. दूध उत्पादक संघ (गोकुळ) चे सिलेक्ट टेट्रापॅक (यु.एच.टी) दूध भारतीय नौदल सेनेला पुरवठा करण्याचा करार झाला असून आज टेट्रापॅक दुधाच्या पहिल्या २२ हजार लिटर्सची पहिली बॅच भारतीय नौदल सेना (नेव्ही) कारवार (कर्नाटक) या ठिकाणी पाठविण्यात आली. या गाडीचे पुजन व शुभारंभ संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांचे हस्ते व संचालक मंडळ यांच्या उपस्थित करण्यात आले. यावेळी बोलताना संघाचे चेअरमन विश्वास पाटील म्हणाले कि उच्च तंत्रज्ञानाचा उपयोग करून सिलेक्ट टेट्रापॅक (यु.एच.टी.) संघाने नव्याने उत्पादीत केलेले तसेच सामान्य तापमानामध्ये १८० दिवस टिकणारे गोकुळ ब्रॅण्डचे सिलेक्ट टेट्रापॅक दूध हे नवीन उत्पादन प्रथमच भारतीय नौदल सेनेच्या कर्नाटक येथील कारवार या सेंटरला २ लाख ६७ हजार लिटर्स दूध पुरवठा आपल्या संघामार्फत होणार आहे. याचा गोकुळ परिवारातील सर्व घटकांना अभिमान आहे. याचे सर्व श्रेय संघाचे लाखो दूध उत्पादक,हितचिंतक व संघाचे सर्व अधिकारी कर्मचारी यांना जाते. तसेच गोकुळ ब्रॅण्डची उत्पादने नेहमीच गुणवत्तपूर्ण असल्याने ग्राहकांनी गोकुळची उत्पादने खरेदी करून गोकुळला मानाचे स्थान निर्माण करून दिले आहे. व हा करार करण्यासाठी संघाचे मार्केटींग सुपरवायझर विक्रम कदम यांनी व त्यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतल्या बद्दल कौतुक केले.भविष्यात अजून यात वाढ होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी भारत देशाचे पहिले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत व त्यांचे समवेत असणारे अधिकारी यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. त्यांना गोकुळ परिवाराकडून श्रद्धांजली वाहण्यात आली.यावेळी संघाचे चेअरमन मा.श्री.विश्वास पाटील, माजी चेअरमन व जेष्ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, बाबासाहेब चौगले, सुजित मिणचेकर, बयाजी शेळके, बाळासो खाडे, अंबरिषसिंह घाटगे, चेतन नरके, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रटरी एस.एम.पाटील, डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी,मार्केटींग व्यवस्थापक हनमंत पाटील, उपेद्र चव्हाण, लक्ष्मण धनवडे, इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थीत होते.
Leave a Reply