
कोल्हापूर: प्राथमिक शिक्षण मंडळ, महानगरपालिका, कोल्हापूर सन 2015-2016 चे सुधारित व सन 2016 -2017 चे नवीन अंदाजपत्रक कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूरचे मा. आयुक्त, पी. शिवशंकर तसेच प्राथमिक शिक्षण मंडळ, महानगरपालिका, कोल्हापूरच्या प्र. प्रशासनाधिकारी सौ. प्रतिभा शिवाजीराव सुर्वे यांनी मा. श्री. मुरलीधर जाधव, सभापती स्थायी समिती, कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूर यांचेकडे सादर केले. यावेळी सर्व सन्माननीय स्थायी समिती सदस्य तसेच अतिरिक्त आयुक्त मा. श्री. नितीन देसाई, उपआयुक्त क्र. 1 मा. विजय खोराटे, कोल्हापूर महानगरपालिका, कोल्हापूरचे मुख्य लेखापाल मा. श्री. संजय सरनाईक व शिक्षण मंडळाचे कार्यासन अधिकारी श्री. रंगनाथ रावळ, लेखापाल श्री. मोहन सरवळकर व कार्यक्रम अधिकारी श्री. रसुल पाटील उपस्थित होते.
शिक्षण मंडळाचे सन 2016/17 चे रुपये 42,83,68,470/- चे अंदाजपत्रक सादर केले असून यामध्ये रुपये 28.00 कोटी म.न.पा. फंडातून अनुदान मागणी केले असून अंदाजपत्रकातील विशेष उल्लेखनीय बाबी पुढील प्रमाणे आहेत.
से.मी इंग्रजी शाळा :- सध्या 7 मनपा प्राथमिक शाळां से.मी इंग्रजी मध्ये सुरु असून जून, 2016 मध्ये नवीन तीन सेमी इंग्रजी मनपा प्राथमिक शाळा सुरु करणेत येणार असून त्यासाठी आवश्यक अर्हताप्राप्त शिक्षक वर्ग तसेच आवश्यक शैक्षणिक साधने, सुविधां उपलब्ध करणेत येणार आहेत.
शैक्षणिक सुविधा :- मनपा शाळांसाठी कोल्हापूर महानगरपालिका,कोल्हापूरच्या स्वमालकीच्या 57 इमारती उपलब्ध करुन देणेत आलेल्या असून या शाळांमध्ये विद्यार्थ्याना स्वच्छ पिण्याचे पाणी, फर्निचर साहित्य, शैक्षणिक तक्ते, सायन्स साहित्य, स्वच्छतागृह इत्यादी सुविधा उपलब्ध आहेत.
ई लर्निग सुविधा :- सध्या 6 मनपा प्राथमिक शाळांमध्ये ई लर्निग सुविधा असून सन 2016 चे शैक्षणिक वर्षी आणखीन 25 मनपा शाळांसाठी ई लर्निग सुविधा (प्रोजेक्टर) पुरविणेत येणार असून त्यासाठी आवश्यक तरतूद अंदाजपत्रकामध्ये प्रस्तावित करणेत आलेली आहे.
संगणक :- 59 मनपा प्राथमिक शाळांसाठी यापूर्वी संगणक सुविधा उपलब्ध करुन देणेत आलेल्या असून या शैक्षणिक वर्षामध्ये आणखीन 25 संगणक पुरविणेत येणार असून त्यासाठी आवश्यक तरतूद अंदाजपत्रकामध्ये प्रस्तावित करणेत आलेली आहे.
शालेय सराव परीक्षा :- मनपा शाळांतील विद्यार्थी शासकीय शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये बहुसंख्येने यश संपादन करावेत यासाठी शालेय सराव परींक्षांचे आयोजन करणेत येणार असून येत्या शैक्षणिक वर्षातील इ. 5 वी व इ. 8 वी चे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये मनपा शाळांतील बहुसंख्य विद्यार्थी निश्चितच यश संपादन करतील अशी आशा आहे.
क्रीडा स्पर्धा :- मनपा जिल्हास्तर शासकीय शालेय क्रीडा स्पर्धा तसेच मनपा शाळा आंतरशालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणेत आलेले असून त्यासाठी आवश्यक तरतूद अंदाजपत्रकामध्ये करणेत आलेली असलेने मनपा शाळांतील विद्यार्थ्यी निश्चितच शहर/जिल्हा/राज्य/राष्ट्रीय स्तरावर क्रीडा विभागामध्ये उज्वल यश संपादन करील अशी आशा आहे.
विज्ञान प्रदर्शन :- कोल्हापूर शहरातील प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यासाठी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करणेत येणार आहे. त्यामुळे मनपा शाळांतील विद्यार्थ्याचा विज्ञान प्रकल्प राज्य/राष्ट्रीय स्तरावर निश्चितच सहभागी होऊ शकेल.
सांस्कृतिक कार्यक्रम :- शहरातील प्राथमिक शाळांतील विद्यार्थ्यांचे कलागुणांना वाव मिळावा व त्यातूनच भविष्यात कलाकार निर्माण् होणेसाठी मदत व्हावी यासााठी प्रतिवर्षी प्रमाणे 26 जानेवारी 2017 रोजी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करणेत येणार आहे.
शिक्षक प्रशिक्षण :- मनपा शाळांतील शिक्षक अध्यापनाने परिपूर्ण असावेत याकरिता शिक्षकांना शिक्षण तज्ञ व्यक्तींमार्फत प्रशिक्षण देणेचे नियोजन करणेत येत असून त्याचा लाभ संबधित शिक्षक तसेच विद्यार्थ्याना होणार आहे.
Leave a Reply