
कोल्हापूर : सुभाष नगर येथील साई मंदीरसमोर राहणाऱ्या शकुंतला व्हटकर (वय 60)यांच्या घरी 26 जानेवारी रोजी कुलुप तोडून बॅग मधील सुमारे 3 लाख 33 हजार रुपयांचे दागिने चोरिस गेले. चोरी झाल्यापासून शेजारील जावेद अस्लम शेख (वय 36) हा भाडेकरु बेपत्ता होता. पोलिसांना गुप्त खबर मिळताच त्यांनी जावेदला पकडले. त्याने गुह्याची कबुली दिली. त्याने दागिने चोरून सराफास विकले. राजरामपुरी पोलिसांनी ही कारवाई केली.
Leave a Reply