
कोल्हापूर: ओला इलेक्ट्रिक या कंपनीचे उपाध्यक्ष बी.सी.दत्त
यांच्याशी आ. ऋतुराज पाटील यांनी ओला इलेक्ट्रिक कंपनीच्या कोल्हापुरातील विस्ताराबाबत आणि ग्राहकांना देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे सविस्तर संवाद साधला.प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आणि इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी पालकमंत्री ना. सतेज (बंटी) पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतेच गृहनिर्माण संस्था आणि इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारणाऱ्या व्यक्तींना मालमत्ता करात सवलत देणारी कोल्हापूर महानगरपालिका ही राज्यातील पहिली महानगरपालिका ठरली असल्याचे श्री. दत्त यांच्या निदर्शनास आणून दिले.याचसोबत, कोल्हापुरला फाउंड्री आणि वाहन उत्पादन क्षेत्रातील उद्योगांचा मोठा वारसा आहे. फक्त भारतातच नव्हे तर जवळपास जगातील प्रत्येक वाहनातील किमान एक पार्ट हा कोल्हापुरातील उद्योगांमध्ये तयार झालेला असतो. वाहन उद्योग क्षेत्रातील कोल्हापुरातील ही कुशलता आणि मनुष्यबळ येणाऱ्या काळात इलेक्ट्रिक वाहनांना लागणारे पार्ट्स , तसेच चार्जिंग स्टेशन सह अन्य पूरक उत्पादने बनवण्यासाठी वापरता येतील का ? याबद्दल चर्चा झाली. यासाठी कोल्हापूरमध्ये इ- व्हेईकल्स वर विशेष लक्ष केंद्रित करणारी इंडस्ट्री उभारण्यात येऊ शकेल का ? याबाबत सांगोपांग चर्चा झाली.यावेळी दत्त यांनी कोल्हापुरकरांच्या उद्योजकतेचे व सकारात्मक चे कौतुक केले. महानगरांऐवजी कोल्हापूर सारख्या उद्यमशील शहरात असे युनिट स्थापन करणे कदाचित अधिक किफायतशीर ठरू शकेल ,असे प्रतिपादन केले.
यावेळी त्यांनी पालकमंत्री ना. सतेज (बंटी) पाटील व आ. ऋतुराज पाटील यांचे कोल्हापूरमध्ये इलेट्रीक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी घेतलेल्या पुढाकाराबद्दल आणि ओला कंपनीला केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.
Leave a Reply