
कोल्हापूर:महापालिकेने थकीत असलेल्या घरफाळ्यासाठी सर्वसामान्यांना जप्तीच्या नोटिसा काढल्या आहेत, थकीत घरफाळ्याबद्दल नेत्यांना एक तर सर्वसामान्यांना वेगळा न्याय का असा सवाल करत माजी महापौर सुनील कदम यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत महापालिका प्रशासनाला विचारला.कोल्हापूर महापालिकेने चालू आर्थिक वर्षात घरफाळा वसुली साठी जोरदार मोहीम सुरू केली आहे, थकीत असलेल्या घरफळाधारकांना नोटिसा आणि जप्तीची कारवाई महापालिकेने सुरू केली मात्र कोट्यावधीचा घरफाळा बुडवलेल्या नेत्यांना घरफाळा वसुलीची कारवाई कधी होणार असा प्रश्न माजी महापौर सुनील कदम यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत उपस्थित केला. घरफाळा निश्चित होऊनही चार पाच महिने उलटले तरीही घरफाळा वसूल करण्याची कोणतीही कारवाई महापालिकेने केली नसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले, पत्रकार परिषदेला आघाडीचे गटनेते सत्यजित दादा कदम उपस्थित होते.
Leave a Reply