
कोल्हापूर: कोडोली को-ऑप. हौसिंग सोसायटीचे संचालक मंडळ बरखास्त करून सोसायटीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.गेल्या ८ ते १० वर्षात पन्हाळा येथील या सोसायटीत हजारो रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे.सोसायटीचे आजपर्यंत कोणत्याही प्रकारचे ऑडीट झालेले नाही.संस्थेतील चेअरमन,सचिव आणि काही संचालक यांनी मिळून प्लॉट धारकांच्या मर्जीनुसार मानाचा कारभार करत गृहसंस्थेतील प्लॉटची बेकायदेशीररित्या व्यवसायासाठी खरेदी –विक्री केली आहे.सर्व नियम धाब्यावर बसवत आजपर्यंत पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर न करता निवडणूक अधिकारी यांना हाताशी धरून संचालक आणि चेअरमन यांची निवड केली.तसेच बेकायदेशीरपणे ब वर्ग सभासद करून त्यांना संस्थेच्या कामकाजात समविष्ट करून घेतले.आहे.या प्रकरणी नॅशनल ब्लॅक पँथर पक्षाचे राष्ट्रीय सचिव डॉ.सुनील पाटील यांच्याकडे याबाबतची तक्रार गेली असता याचे गांभीर्य लक्ष्यात घेऊन वारंवार पक्षाच्या वतीने आंदोलने,निदर्शने करण्यात आली.याचा परिणाम म्हणून आज या संस्थेवर प्रशासक नेमण्यात आला आहे.तरी सदर सोसायटीत झालेल्या खरेदी-विक्री केलेल्या रजिस्ट्रर दस्तापासून त्या व्यक्तींची नावे लागेपर्यंत जे संबंधित अधिकारी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी.राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोसायटीत मंजूर केलेले परवाने रद्द करून संबंधित अधिकारी यांच्यावर कारवाई करावी,तसेच संस्थेतील वाणिज्य व्यापार रद्द करावा. अशी मागणी नॅशनल ब्लॅक पँथर पक्षाच्यावतीने पत्रकार परिषदेत करण्यात आली.यावेळी राष्ट्रीय सचिव सुनील पाटील,जिल्हा अध्यक्ष अमित पावले,युवक अध्यक्ष चंद्रकांत चौगले,राहुल कांबळे,जीवनसिंग,उमेश चांदणे,उमेश कांबळे,महिला अध्यक्षा आशाताई टोपकर तसेच पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Leave a Reply