
कोल्हापुर :शिवाजी विद्यापीठाचा विदेशी भाषा विभाग आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळ, मुंबई अशी संयुक्तपणे ‘नवलेखक (कथा) कार्यशाळा‘आयोजित केली आहे. या कार्यशाळेमध्ये कथालेखनासंदर्भात विविधांगी मार्गदर्शन केले जाणार आहे. समकालीन साहित्य आणि कथा, समकालीन कथा, कथेची निर्मिती प्रक्रिया, कथेची प्रयोगशीलता याबरोबरच आजचे आघाडीचे कथालेखक आपल्या कथेविषयी, निर्मिती प्रक्रियेविषयी मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेमध्ये नवकथालेखकांना मार्गदर्शन करण्यासाठी साहित्य अकादेमी पुरस्कारप्राप्त कथाकार जयंत पवार, भास्कर चंदनशीव,आसाराम लोमटे, कृष्णात खोत, निशिकांत गुरव, किरण गुरव आणि आप्पासाहेब खोत हे मराठीतील आघाडीचे कथाकार मार्गदर्शन करणार आहेत. ही कार्यशाळा उद्या १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत असून ही कार्यशाळा नि:शुक्ल आहे. ती शिवाजी विद्यापीठाच्या वि. स. खांडेकर भाषाभवन सभागृहामध्ये संपन्न होईल. इच्छुक नवलेखकांनी कार्यशाळेत सहभागी व्हावे असे अवाहन विदेशी भाषा विभाग प्रमुख डॉ. मेघा पानसरे यांनी केले आहे
Leave a Reply