
कोल्हापूर : कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना ईडीने १९९३ बॉम्बस्फोटातील सहभागी दाउद इब्राहीम सोबत केलेल्या मनी लाँडरिंग व दाउद इब्राहिमची बहिण हसीना पारकर कडून अल्पशा किंमती मध्ये जमीन विकत घेतल्या प्रकरणी अटक केली. राज्यातील कॅबिनेट मंत्र्याकडून झालेल्या या गंभीर प्रकरणात त्यांचा राजीनामा घेण्याऐवजी हे सरकार त्यांना पाठीशी घालत आहे. अशा महाविकास आघाडी सरकार विरोधात आज भारतीय जनता पार्टीने जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करून मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली. आंदोलनाच्या सुरुवातीला ११९३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटातील मृतांना श्रद्धांजली देण्यात आली. यानंतर भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी या महाविकास आघाडी सरकार व नवाब मलिक यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. राजीनामा द्या राजीनामा द्या नवाब मलिक राजीनामा द्या, राजकारणात गुन्हेगारी आणणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, नवाब मलिकच करायचं काय खाली डोक वर पाय अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. यानंतर भगवान काटे, गणेश देसाई, हेमंत आराध्ये, अजित ठाणेकर, विजय जाधव, हंबीरराव पाटील यांनी आपल्या मनोगता मध्ये आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या त्याचबरोबर नवाब मलिक हे राजीनामा देत नाहीत किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांची मंत्री मंडळातून हकालपट्टी करत नाहीत तोपर्यंत भाजपाचे हे आंदोलन विविध मार्गाने सुरु राहील असे सांगितले.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे म्हणाले, गेल्या २७ महिन्यांत या सरकारने सर्व भ्रष्ट मंत्र्यांना पाठीशी घालण्याचे काम केले आहे. जनसेवेच्या नावाखाली स्वत:चे हित जोपासणे, सत्तेचा उपयोग फक्त आणि फक्त बक्कळ पैसा मिळवणे अशा स्वरूपाचा असून राज्यातील जनतेसमोर महाविकास आघाडी सरकारच्या खरा चेहरा समोर येऊ लागला आहे. जनतेच्या गरजा पूर्ण करण्या एवजी राज्यातील मंत्री कोटीच्या कोटी वसुली करण्याच्या व्यवस्थेत व्यस्त आहेत.
यामध्ये अधिक भर म्हणून काल महाविकास आघाडी सरकार मधील कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना ईडीने १९९३ बॉम्बस्फोटातील सहभागी दाउद इब्राहीम सोबत केलेल्या मनी लाँडरिंग व दाउद इब्राहिमची बहिण हसीना पारकर कडून अल्पशा किंमती मध्ये जमीन विकत घेतल्या प्रकरणी अटक केली. स्व.बाळासाहेब ठाकरे ज्या दाउद इब्राहीमला सातत्याने देशद्रोही संबोधत होते आज त्याला सहाय्य करणाऱ्या मंत्र्याला वाचवण्यात राज्याचे मुख्यमंत्री कार्यरत दिसत आहेत ही बाब दुर्देवी असून हिंदुत्वाचा अजेंडा मा.मुख्यमंत्री यांनी सत्तेच्या हव्यासापोटी सोडलेला दिसत आहे. त्यामुळे जोपर्यंत नवाब मलिक यांची मंत्री मंडळातून हकालपट्टी होत नाही तोपर्यंत भारतीय जनता पार्टी आपला संघर्ष सुरु ठेवेल असे सांगितले.
याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष संजय सावंत, चंद्रकांत घाटगे, मारुती भागोजी, ग्रामीण जिल्हा सरचिटणीस विठ्ठल पाटील, मामा कोलवणकर, विजय खाडे-पाटील, मंडल अध्यक्ष आशिष कपडेकर, रविंद्र मुतगी, अभिजित शिंदे, गिरीश साळोखे, महेश यादव, गणेश चिले, दिलीप बोंद्रे, अमर साठे, इकबाल हकीम, संजय जासूद, राजेंद्र वडगावकर, प्रसाद पाटोळे, किशोर लाड, दिनेश पसारे, विजय शिंदे, सचिन साळोखे, किरण कुलकर्णी, धीरज पाटील, गजानन हेगडे, सचिन गणमळे, हंबीरराव पाटील, अक्षय वरपे, दादासो देसाई, युवराज सरवदे, प्रथमेश मोरे, प्रशांत माने, बालाजी चौगले, अमित तीरपाणकर, सुरज दावणे, ओ.बी.सी महिला मोर्चा अध्यक्षा विद्या बनछोडे, कोमल देसाई, राधिका तेली, स्वाती तेली, परिसा बनछोडे ई. पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply