खा. संभाजीराजे यांच्या उपोषणाला राज्यभरातून वाढता पाठिंबा 

 

मराठा समाजाच्या प्रमुख मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी येत्या २६ फेब्रुवारी पासून खासदार संभाजीराजे छत्रपती   आमरण उपोषणास बसणार आहे. या उपोषणास संपूर्ण महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद मिळत आहे. अनेक ग्रामपंचायत, सामाजिक संघटना, तालीम संस्थाच्या पाठिंब्याची पत्रे प्राप्त होत आहेत. त्यामुळे सर्वांच्या पाठिंब्याच्या जोरावर निश्चितपणे मराठा समाजाला न्याय मिळवण्यासाठी हातभार लागणार आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षण व रोजगारासाठी पाठबळ म्हणून विविध मागण्या राज्य सरकारकडे करण्यात आल्या आहेत. मात्र याकडे राज्य शासनाने दुर्लक्ष केले आहे. याच्या निषेधार्थ आणि मागण्या त्वरित मान्य करून त्यांची अंमलबजावणी तातडीने व्हावी यासाठी खासदार संभाजीराजे मुंबईतील आझाद मैदानात दि. २६ फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करणार आहेत. खा. संभाजीराजे यांच्या आंदोलनाला पाठबळ म्हणून अनेक ग्रामपंचायत, संघटना, तालीम संस्थांमार्फत ग्रामीण, शहर, तालुका, जिल्हा पातळीवर बैठका आयोजन, मेळावे, पत्रकार परिषदा घेतल्या जात आहेत. केवळ मराठा समाजच नव्हे तर, बहूजन समाजातील लोकांकडूनही मोठ्या प्रमाणात पाठबळ मिळत आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातून  याबबतची ठराव पत्रे सकल मराठा समाजाकडे पाठविली असून ती सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित केली जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!