
कोल्हापूर:महाविकास आघाडीच्या वतीने ईडीच्या कारवाईचा निषेध करत आज महाविकास आघाडीने कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी चौकात आंदोलन केले. या आंदोलनात सहभागी होत श्रीमती जयश्री चंद्रकांत जाधव यांनी निदर्शन केली. दडपशाहीच्या निषेधार्थ यावेळी मोदी सरकार, ईडीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.यावेळी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार व विजय देवणे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय पाटील, शहराध्यक्ष आर.के.पोवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply