
कोल्हापूर :शेतीला दिवसा वीज मिळावी या मागणीसाठी कोल्हापुरात गेल्या चार दिवसांपासून महावितरणच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केलेल्या माजी खासदार राजू शेट्टी यांना ग्रामविकास मंत्री यांनी भेट दिली. मंत्री श्री. मुश्रीफ यांनी माजी खासदार श्री. शेट्टी यांना आंदोलन थांबवून मुंबईत मंत्रालयात ऊर्जा मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊया, असे आवाहनही केले. परंतु श्री शेट्टी याने बैठकीतून काही ठोस निर्णय होत नसल्याचे सांगत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला.धरणे आंदोलन स्थळी पोहोचताच मंत्री श्री. मुश्रीफ यांनी श्री शेट्टी व शेतक-यांशी चर्चा केल्यानंतर महावितरणचे कार्यकारी संचालक विजय सिंगल यांना फोन केला. तोच फोन श्री. शेट्टी यांच्याकडे दिला. या दोन्ही नेत्यांची चर्चा झाली.त्यानंतर महावितरणचे सचिव श्री. वाघमारे यांना मंत्री श्री. मुश्रीफ यांनी फोन केला व राजू शेट्टी यांच्याशी बोलणी करून दिली. त्यानंतर ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनाही फोन करून मंत्री श्री.मुश्रीफ यांनी तो फोन शेट्टी यांच्याकडे दिला. श्री शेट्टी यांनीही मंत्री श्री. राऊत यांच्याशी सविस्तर चर्चा केली.शेतीला रात्रीची वीज दिल्यामुळे सर्पदंश, जंगली जनावरांचे हल्ले अशा कारणांमुळे शेतकऱ्यांची मृत्यू होत आहेत. अपघात वाढत आहेत. ही बाब माजी खासदार राजू शेट्टी यांनी निदर्शनास आणून दिली. शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा मिळाला पाहिजे, ही भूमिका त्यांनी मांडली. या मागणीवर ते ठाम राहिले.
मंत्री मुश्रीफ यांनी या प्रश्नावर मुंबईत ऊर्जा मंत्री नितीन राऊत व वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक लावून योग्य तो तोडगा काढू. आंदोलन थांबवा, असे आवाहन श्री शेट्टी यांना केले. परंतु; बैठकीतून ठोस काही निर्णय होत नसल्याचे सांगत श्री. शेट्टी यांनी आंदोलन पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला.
Leave a Reply