
कोल्हापूर : शहर पाणी पुरवठा विभागामार्फत सिद्धार्थनगर येथील ज्या थकबाकी धारकांनी वेळोवेळी नोटीस देऊन थकबाकी भरलेली नाही असे एकूण 12 नळ कनेक्शन तोडण्यात येऊन पाणी पुरवठा खंडीत करण्यात आलेला आहे. आज दिनांक 17/3/2016 रोजी पाणी पुरवठा विभागामार्फत छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पीटल यांचेकडून 25 लाख वसुली करण्यात आलेली आहे. आज रोजी एकूण 27,85,,000/- इतकी वसूली करण्यात आली. सदरची कारवाई उप-आयुक्त विजय खोराटे, जल-अभियंता मनिष पवार, उप-जलअभियंता रावसाहेब चव्हाण तसेच पथक प्रमुख मोहन जाधव, पंडीत भादुलकर, मारुती पाटील, पोपट जांभळे, सचिन जाधव, रणजित संकपाळ, सचिन लाहिगडे, भाग फीटर ताजुद्दीन सिध्दनाळे यांनी कारवाईमध्ये भाग घेतला सदरची मोहिम यापुढेही चालू ठेवणेत येणार आहे, तरी नागरीकांनी पाणी बीलाची रककम त्वरीत भरुन सहकार्य करावे व कटु प्रसंग टाळवेत असे आवाहन करण्यात येत आहे.
Leave a Reply