
मुंबई: महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लाँडरिंग प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना ११ तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर सक्तवसुली संचालनालय (ईडी)कडून अटक केली होती.आता छगन भुजबळांची रवानगी 31 पर्यंत कोठडीत करण्यात आली आहे छगन भुजबळ यांचे पुतणे समीर सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.भुजबळांनी आपल्या सर्व बँक खात्यांची कागपत्रे तसेच त्यांनी खरेदी केलेल्या विविध मालमत्तांची कागदपत्रे सोबत आणली होती.
एकूण ८७० कोटी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी चौकशी सुरु आहे.दरम्यान, भुजबळ पांढऱ्या टोयोटा कॅमरी (एमएच -१५-ईएक्स १०६९) कारने आले. या कारची नोंदणी मुंबई एज्युकेशनल ट्रस्टच्या नावावर आहे.
भुजबळ यांना त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर रक्कम कुठून आली असे ईडीतर्फे विचारण्यात आले. भुजबळ यांनी हवाला ऑपरेटरला यात ओढले का आणि ज्या बनावट कंपन्यांनी धनादेश दिले त्यांच्याशी या आॅपरेटरने मध्यस्थी केली का याची आम्ही खातरजमा करीत असल्याचे सूत्रांनी सांगितले. समीर आणि पंकज यांना असे व्यवहार मार्गदर्शनाशिवाय व भुजबळ यांच्याकडील पैशांशिवाय करणे शक्य नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. समीर आणि पंकज यांच्या कोणत्याही कंपन्यांमध्ये भुजबळ संचालक नव्हते. महाराष्ट्र सदन आणि कालिना सेंट्रल लायब्ररीच्या बांधकामाचे कंत्राट देण्यासाठी छगन भुजबळ यांनी कंत्राटदाराकडून लाच म्हणून ही रक्कम घेतल्याचा आरोप आहे.
ईडीने परवेश कन्स्ट्रक्शन्सच्या मालकीची ११० कोटी रुपये किमतीची सॉलिटेयर इमारत मागच्या वर्षी जप्त केली. या कन्स्ट्रक्सन्समध्ये समीर आणि पंकज संचालक होते. ईडीने चमणकर इंटरप्रायजेसच्या मालकीची १७.३५ कोटी रुपये किमतीची मालमत्ताही जप्त केली आहे.
Leave a Reply