
कोल्हापूर/ प्रतिनिधी: ‘स्कूल्स ऑफ लाइफ केअर’ हे टॅगलाईन घेऊन शाहूपुरी येथील जुगाड कौन्सिलिंग सेंटर हे पश्चिम महाराष्ट्रात गेली दहा वर्षे समुपदेशन क्षेत्रात सामाजिक बांधिलकीने काम करत आहे. संपूर्ण महाराष्ट्रात वैशिष्ट्यपूर्ण ठरलेल्या ‘ऑनलाइन ज्येष्ठांची शाळा’ हा अभिनव व मोफत उपक्रम जुगाडने दोन वर्षांपूर्वी कोरोना लॉकडाऊन काळात सुरू केला. आणि या शाळेला संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक शहरांमधून ज्येष्ठांचा उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे. आता जुगाड सेंटर ‘ *मेमरी कॅफे* ‘ नावाचा एक नाविन्यपूर्ण उपक्रम करीत आहे. अशा माहिती जुगाड कौन्सिलिंग सेंटरच्या डॉ.कल्याणी कुलकर्णी यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.ज्येष्ठांना उतार वयात अनेक शारीरिक, मानसिक,भावनिक समस्यांना तोंड द्यावे लागते. ‘मेमरी कॅफे’ या उपक्रमाअंतर्गत ज्येष्ठांनी आपली शारीरिक, भावनिक, मानसिक आरोग्य कसे जपावे. त्यासाठी आवश्यक असणारा आहार ज्येष्ठांच्या भावनिक, बौद्धिक आणि शारीरिक बाबींना चालना देणारे खेळ आर्ट आणि क्राफ्ट, व्यायाम तसेच डिमेन्शिया,अल्झायमरची सुरुवात कशी ओळखायची यासाठी स्क्रीनिंग टेस्ट अशा अनेक गोष्टी तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली जुगाड सेंटरमध्ये सुरू होत आहेत. तसेच कौटुंबिक समुपदेशन ज्येष्ठ लोकांचे पालकत्व कसे करावे, ते करताना येणाऱ्या अडचणी यावर जुगाड सेंटरमध्ये मार्गदर्शन करण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या या संस्थेकडून घेतले जाणारे बेसिक प्रमाणपत्र हे ज्येष्ठांसाठी आवश्यक असणारे सर्व कोर्सेस जुगाड मधील सर्व समुपदेशकांनी पूर्ण केलेले आहेत. वरील सर्व गोष्टींसाठी जुगाड मध्ये अनुभवी आणि प्रशिक्षित असे समुपदेशक आहेत.
आपली जीवनसंध्या अधिक सुखकर होण्यासाठी कोल्हापूरमधील सर्व ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक संघ, हास्यक्लब, प्रतिष्ठित तालीम, मंडळे, ज्येष्ठांचे क्लब, वृद्धाश्रम सदस्य यांना मेमरी कॅफे आपल्या भागात सुरू करायचे असल्यास कृपया ७५८,मोघे प्लाझा, मुळे विहीर बस स्टॉप,शाहूपुरी,कोल्हापूर या पत्त्यावर संपर्क साधावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले. पत्रकार परिषदेस सुरेश खांडेकर, सौ. सुखदा आठले, सौ.गीता हसुरकर,डॉ. शैलजा कळेकर आदी उपस्थित होते.
Leave a Reply