निवडणूकीसाठी पोलीस यंत्रणा सज्ज

 

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूकीसाठी दि.1 नोव्हेंबर 2015 रोजी मतदान होत आहे. यापा­र्ाभुमीवर कायदा व सुव्यवस्थेबाबत आज महानगरपालिका छ.ताराराणी सभागृहात महानगरपालिका व पोलिस प्रशासन यांची संयुक्त बैठक संपन्न झाली. आयुक्त पी.शिवशंकर व अपर पोलिस अधिक्षक एस. चैतन्या यांचे प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली.    प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी जलज शर्मा व मनिषा खत्री हे या बैठकीस उपस्थित होते.
यावेळी एस.चैतन्य यांनी पोलिस प्रशासनाकडून शहरातील संवेदनशील मतदान केंद्राची माहिती दिली. तसेच प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया व मतमोजणी प्रक्रियेसाठी आवश्यक पोलिस बंदोबस्त ठेवणेत आला असल्याचे सांगितले. यामध्ये ई.व्ही.एम. मशीन मतमोजणी केंद्रापर्यंत पोहचविणेसाठी स्वतंत्र पोलिस बंदोबस्ताची व्यवस्था ठेवणेत येणार आहे.
यावेळी पोलिस यंत्रणा व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आपसाथ समन्वय ठेवून आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी अशा सुचना आयुक्त पी.शिवशंकर यांनी दिल्या. तसेच आचारसंहिता अंमलबजावणी प्रभावीपणे पार पाडणेसाठी नियुक्त केलेल्या भरारी पथकांची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी घेवून त्यामध्ये आवश्यक त्या सुधारणा करुन आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करावी अशा सुचनाही आयुक्त पी.शिवशंकर यांनी दिल्या.
या बैठकीस उपायुक्त ज्ञाने­ार ढेरे, विजय खोराटे, निवडणूक निर्णय अधिकारी संजय पवार, स्वाती देशमुख, विद्युत वरखेडकर, शैलेश सुर्यवंशी, शंकर भोसले, बाबासो बेलदार, आचारसंहिता पथक प्रमुख भाऊसाहेब गलंाडे, सहाय्यक आयुक्त उमेश रणदिवे, उपविभागीय पोलिस अधिकारी भारतकुमार राणे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन गिरी, दिलीप सावंत, आर.एस.चौबे, कल्पना ढवळे, मनिषा देशपांडे, ऋषीकेश शेळके, हणमंत पाटील, आचारसंहिता नियंत्रण अधिकारी धनंजय खोत, पोलिस निरीक्षक अरविंद चौधरी, अमृत देशमुख, दयानंद ढोमे, अनिल देशमुख, परिक्षाधीन पोलिस उपअधिक्षक माधव पंडिले, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्कचे आर.एस.जाधव, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!