गोकुळमध्ये कृष्ण जन्माष्टमी साजरी:

 

कोल्‍हापूर:कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध संघाच्‍यावतीने प्रधान कार्यालय गोकुळ शिरगाव  येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आले होते. यावेळी श्रीकृष्ण जन्मकाळ निमित्ताने पाळण म्हनण्यात आला तसेच संघाचे चेअरमन विश्वासराव पाटील व त्‍यांच्‍या पत्‍नी उर्मिला विश्वासराव पाटील(काकी) यांचे शुभहस्‍ते मूर्तीस अभिषेक व सत्यनारायण पूजा करण्यात आली यावेळी कोगील बु.ता.करवीर येथील श्री हनुमान भजनी मंडळा मार्फत भजन,गवळण  गायनाचे  आयोजन करण्यात आले होते व  मंदिरास,गोकुळ प्रधान कार्यालय येथे आकर्षक विद्यूत रोषणई करण्‍यात आली होती.

          यावेळी संघाच्या वतीने कर्मचाऱ्यासाठी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये संघाचे उत्पादन विभाग,प्रोसेस विभाग, अभियांत्रिकी विभाग,गुणनियंत्रण विभाग,गोडावून विभाग,प्रिपॅक विभाग, डेअरी डॉक विभाग या विभागातील गोविंदा पथकांनी दहीहंडी मध्ये सहभाग घेतला होता. तर उत्पादन विभागाने चार थर लावून दहीहंडी फोडली.त्यांना संघाच्या वतीने प्रोत्साहनपर २५,०००/- रुपये बक्षीस देण्यात आले.यावेळी विजेत्या संघास बक्षीस देताना संघाचे चेअरमन विश्वासराव पाटील,संचालक प्रकाश पाटील,शासननियुक्त संचालक मुरलीधर जाधव, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले,बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील,डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी,प्रशासन व्यवस्थापक डी.के.पाटील व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!