
कोल्हापूर : रॉयल एनफील्डच्या वतीने एप्रिल महिन्याच्या पहिल्या रविवारी वन डे राईड चे आयोजन सम्पूर्ण भारतात केले जाते. कोल्हापुरात रॉयल रायडर्स क्लब आणि मोटार इंडियाच्या वतीने 3 एप्रिल रोजी कोल्हापुर ते तवंदी घाट निपाणी या मार्गावर या राईड चे आयोजन करण्यात आले आहे.सकाळी 8 वाजता या राईडला सरनोबतवाडी जवळील मॅकडोनाल्ड येथून प्रारंभ होणार असून सकाळी 10.30 ला तवंदी घाट येथे या रॅली ची सांगता होणार आहे. सुमारे 200 हुन अधिक रॉयल इनफील्ड बुलेटस्वार यात सहभागी होणार आहेत.तरी इच्छुकांनी सुरक्षा साधनांसह सहभागी होण्यासाठी ताराराणी चौक येथील मोटार इंडिया येथे संपर्क साधावा असे आवाहन रत्नाकर बंदिवाड़ेकर आणि रॉयल क्लब चे अध्यक्ष जयदीप पवार, ऋषिराज जामदार यांनी केले आहे.
Leave a Reply