कोल्हापूर : कोल्हापुरातील हर्षवर्धन साळुंखे आणि आरुफ शेख या दोन तरुणांनी जगातील पहिले इंस्टंट गेमिंग आणि चॅटिंग चालणारे फ्रिक नावाचे मोबाईल अप्लिकेशन तयार केले असून येत्या १० तारखेपासून हे अप्लिकेशन प्ले स्टोअरवर ग्राहकांसाठी मोफत उपलब्ध असणार आहे.या अॅपद्वारे तुम्ही तुमच्या मोबाईलवरील कॉनटॅक्टबरोबर अॅपमधील गेम्स व चॅट एकाचवेळी करू शकता.यात दर महिन्याला ५ नवीन गेम्स मिळत राहणार आहेत.हे अप्लिकेशन कोणत्याही प्रकारच्या मोबाईलवर डाऊनलोड करता येते.तसेच गेमिंग सोडून यामध्ये चॅटिंग,फाईल्स,आणि डॉक्युमेंट शेअरिंग,स्टिकर्स ऑडीओ बझ,मल्टीपल प्रोफाईल पिक्चर,चॅनेल्स यासारखे भरपूर नवीन मनोरंजन करणारे ऑप्शन पूर्णपणे मोफत मिळणार आहेत.असे हे एकमेव जगातील अप्लिकेशन आहे.तसेच भविष्यात यात नवनवीन गोष्टी समाविष्ठ करण्यात येणार असून विद्यार्थ्याना क्विझसारखे गेमही असून त्याचा फायदा त्यांच्या भावी आयुष्यात त्यांना होणार आहे.असे हर्षवर्धन साळुंखे आणि आरुफ शेख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
गेमिंग हे क्षेत्र सर्वात जास्त महसूल मिळवून देते.त्यामुळे भारतातील आणि भारताबाहेरील कंपन्या अशा अपच्या शोधात असतात.त्यामुळे भारताच्या डिजिटल इंदियव स्टार्ट अॅप इंडिया या दोन्ही अभियानास जोड मिळणार आहे.व्हॉटस अप,हाईक सारख्या प्रतीस्पर्धी अॅप असूनही फ्रिक(freak)हे अॅप आपल्या वेगळेपणामुळे लवकरच आयटी क्षेत्रात उत्तुंग भरारी घेईल असा विश्वास क्षेत्रातील तज्ञांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply