
कोल्हापूर: पर्यावरणपूरक भावना आणि श्रद्धेचा उत्तम मिलाप असलेले बोधचिन्ह कन्यागत महापर्वासाठी अत्यंत दिशादर्शक आणि समर्पक आहे. पर्यावरण, श्रध्दा आणि पावित्र्य यांचा संदेश यातून सर्वदूर जाईल. असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
शिरोळ तालुक्यातील नृसिंहवाडी येथील तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे होणाऱ्या कन्यागत महापर्वकाळ 2016-2017 निमित्त तयार करण्यात आलेल्या बोधचिन्हाचे अनावरण पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार राजू शेट्टी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील, आमदार उल्हास पाटील, आमदार गणेश हुक्केरी, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार,प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे, तहसिलदार जलज शर्मा, कुरंदवाडच्या नगराध्याक्षा मनिषा डांगे,सरपंच अरुंधती जगदाळे, श्री. नरसिंह सरस्वती, स्वामी दत्त देवस्थान संस्थानचे अध्यक्ष राहूल पुजारी आदि मान्यवर उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे होणार असलेल्या कन्यागत महापर्वकाळासाठी तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत विविध विकास कामे होणार आहेत. पर्वणीच्या निमित्ताने या भागातील पायाभूत सुविधा व आजूबाजूच्या परिसराचा विकास करण्यासाठी शासनाने 121 कोटींचा आराखडा मंजूर केला आहे. ही सर्व विकास कामे एका सुत्रात बांधण्याचे काम व कन्यागत महापर्वाच्या मंगलमय वातावरण निर्मितीचे काम बोधचिन्हाच्या माध्यमातून होणार आहे. बोधचिन्हामध्ये दर्शविण्यात आलेल्या आठ पाकळ्या श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथील आठ तिर्थांचा पावित्र्य दर्शवविण्याऱ्या यामध्ये गंगेचा प्रवाह दर्शविण्यात आला आहे. भक्ती आणि श्रध्दा या बरोबरच पर्यावरण संवर्धनाचा संदेशही हे बोध चिन्ह आपल्याला देते. कन्यागत मधील बेटी बचाव बेटी पढावो अभियानही यशस्वी करण्याची गरज आ
Leave a Reply