15 एप्रिल पर्यंत एफआरपी मिळालीच पाहिजे: खा. शेट्टी

 

कोल्हापूर :IMG-20160403-WA0011देशातील साखरेचे दर वाढून देखील राज्यातील साखर कारखान्यांनी एक रकमी FRP दिलेली नाही. हंगाम संपत आला तरी देखील FRP ची उर्वरित रक्कम कारखान्यांनी शेतकऱ्यांना वर्ग केलेली नाही. १५ एप्रिल पूर्वी एक रकमी FRP ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा अन्यथा रस्त्यावर उतरून पुन्हा आंदोलन करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय. ते कोल्हापुरात शेतकऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते. FRP च्या उर्वरित असणाऱ्या राक्कामे सोबत त्याचं व्याज देण्याची तरतूद कायद्यात आहे त्यामुळे पर्यायानं साखर कारखान्यांची साखर जप्त करून शेतकऱ्यांचे पैसे भागवा यासाठी साखर आयुक्तावर दबाव टाकावा लागेल असे शेट्टी यांनी सांगितलं.नुसतं आसूड दाखवून भागात नाही … तर आसुडाचे फटके द्यावे लागतात…. ते द्यायला कुठ तरी सहकार मंत्री कमी पडतात म्हणून त्यांना अगतेन बोलाव लागत अशा बोचऱ्या शब्दात खासदार राजू शेट्टी यांनी सहकार मंत्री चंद्रकात पाटील यांच्यावर टीका देखील केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!