
कोल्हापूर : अल्पावधीतच कोल्हापूर आणि कोल्हापूर बाहेरील पर्यटकांना आपलेसे वाटणारे हॉटेल के ट्रीमध्ये सी फूड फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले आहे.अंतरराष्ट्रीय शेफ मिलिंद सोवनी यांचा सहभाग हे या फेस्टिवलचे खास वैशिष्ट्य असणार आहे. तसेच चोखंदळ खवय्यांसाठी भारतातील समुद्रकिनारी प्रदेशातील पदार्थांची चव चाखायला मिळणार आहे.अशी माहिती दर्शनी हॉटेल अंड हॉस्पिटालिटी प्रा.ली च्या चेअरमन कविता कडेकर यांनी दिली.
३१ आक्टोबर ते ९ नोव्हेंबर या कालावधीत हा महोत्सव होणार आहे.याआधीही के ट्रीच्या वतीने अस्सल महाराष्ट्रीयन पदार्थ तसेच कबाब फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले होते.याला खवय्यांचा भरभरून प्रतिसाद लाभला होता.समुद्राची देणगी लाभलेल्या पदार्थांची मेजवानी यात सर्व फिश प्रकार,गोवन डिशेश,कोकणी पदार्थ यांची वैविध्यता असणार आहे.अंतरराष्ट्रीय शेफ मिलिंद सोवनी यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेल्या डिशेश कोल्हापूरकरांना खिलाविण्यात येणार आहेत.या फेस्टिवललाही चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास कविता कडेकर यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेला चिन्मय कडेकर,दिपक कुलकर्णी उपस्थित होते.
Leave a Reply