
कोल्हापूर : कोल्हापूरच्या सहा कलाकारांनी कोल्हापूरचे नाव जगात पोहचेल अशीच कामगिरी केली आहे.या सहा अवलीयानी इंटिग्रेटेड लेगसी या नावाच्या बँडचे नुकतेच सुप्रसिध्द गायिका अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.या बँडचे उद्घाटन करताना मला अतिशय आनंद होत आहे. कोल्हापूरच्या या सहा कालाकारांकडे उपजत संगीतचे ज्ञान आहे.आताच्या पिढीमध्ये प्रचंड आत्मविश्वास असतो.त्याच्या जोरावर हि पिढी परिश्रमाची जोड मिळवत कोणतीही अशक्य गोष्ट सहज साध्य करू शकते.उपजत अंगी कला असणाऱ्या कलाकाराला कोणतीही बंधने अडवू शकत नाहीत असे उद्गार अनुराधा पौडवाल यांनी उद्घाटन प्रसंगी काढले.
आदित्य,अक्षय,अनुराग,शिवराज,शुभंकर आणि प्रथमेश या कोल्हापूरच्या सहा कलाकारांनी इंग्लिश मराठी हिंदी गाण्यांचा खजिना प्रेक्षकांसाठी उपलब्ध करून दिलेला आहे.सुमधुर संगीत मेळ आणि सुश्राव्य चाल यामुळे त्यांचे ऑल द वे हे इंग्लिश गाणे यु ट्यूब,आय ट्युन,अॅपल म्युजिक,गुगल प्ले,सावन,सझम,स्पॉटीफाय यासारख्या संगीत क्षेत्रातील अग्रगण्य साईटवर उपलब्ध आहेत.ऑल द वे हे गाणे सध्या सोशल मिडीयावर गाजत आहे.
एवढ्यावरच थांबणार नसून पुढे अनेक गाणी आणि वेगवेगळ्या ट्युन्स बनविणार आणि कोल्हापूरचे नाव जगात उंचावू असे प्रथमेश देसाई यांनी सांगितले. यावेळी प्रतापसिंह देसाई.कलाकार यासह संगीतप्रेमी उपस्थित होते.
Leave a Reply