
कोल्हापूर : राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त आणि अंतर राष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमधून आपला वेगळा ठसा उमटवणारा सैराट हा आणखी एक समाजातील दाहक वास्तवाचा अनुभव मांडणारा चित्रपट येत्या 29 एप्रिलला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. झी स्टुडिओ निर्मित आणि फँड्री फेम दिग्दर्शक नागराज मंजुळे आणि संगीतकार अजय अतुल यांच्या सुमधुर आणि भन्नाट संगीताने आधीच या चित्रपटाची उत्सुकता ताणली गेली आहे. चित्रपटातील गाणी प्रचंड लोकप्रिय झालेली आहेत. यात एकूण चार गाणी असून गाण्यांचे रेकॉर्डिंग हॉलीवुड मधील जगप्रसिद्ध सोनी स्टुडिओ मधे झाले आहे. मराठी चित्रपटात हे पहिल्यांदाच घडले आहे.प्रत्येक गाणे हे चित्रपटाशी एकजीव झालेले आहे. हॉलीवुड मधे रेकॉर्डिंग करण्याचे स्वप्न यनिमित्ताने पूर्ण झाले. संपूर्ण गाणी कथेला अनुसरुन बनवलेली आहेत लिहली आहेत असे अजय अतुल यांनी पत्रकारांशी मनसोक्त गप्पा मारताना सांगितले.
पुन्हा एक सामाजिक दाहक वास्तव चित्रपटातून दखविण्यात आले आहे. दर्शकांना त्यांचीच कथा दाखविली की आपलीशी वाटते तशीच ही तुमची आमची कथा आहे. यात पुन्हा रिंकु आणि आकाश हे नविन दोन चेहरे पदार्पण करत आहेत.रिंकु राजगुरु ची राष्ट्रीय पुरस्कारांमधे अभिनयाची विशेष दखल घेतली आहे.
भान हरपणारा हा चित्रपट आहे. प्रेमला कोणतेही बंधन नसते. हाच विषय वेगळ्या पद्धतीने हताळला आहे. प्रेक्षकांचा याला चांगला प्रतिसाद मिळेल असा विश्वास झी स्टुडिओचे संस्थापक आणि निर्माते नितिन केणी यांनी व्यक्त केला.
Leave a Reply