
कोल्हापूर : रगेडियन क्लबच्या मोबाईल अप्लिकेशनमुळे माहितीचा खजिनाच आताच्या युवकां ना उपलब्ध होणार आहे असे उद्गार अकाश कोरगावकर यांनी काढले. रगेडियन अप्लिकेशनच्या उद्घटनप्रसंगी ते बोलत होते. रगेडियन क्लब ने आता पर्यन्त कोल्हापूर मॅरेथॉन राग्गड सह्याद्री विविध ट्रेक सारखे उपक्रम राबविले आहेत. विविध सामाजिक उपक्रम सवलत योजना माहिती तसेच कोल्हापुरसह महाराष्ट्र माहिती विविध स्पर्धा या सर्वांची माहिती एकाच ठिकाणी या अप्लीकेशनद्वारे मिळणार आहे. आपल्या मोबाईल वर हे अप्लिकेशन मोफत डाउनलोड करता येणार आहे.भावी पीढी सशक्त आणि संघटित रहावी यासाठी क्लब विविध उपक्रम राबविणार आहे. यात मे महिन्यात पन्हाळा येथे नाइट ट्रेक अफरोड बाइकिंग पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्स एडवेंचर कार्निवल इत्यादी उपक्रम युवकांना प्रेरणादायी ठरतील असे क्लबच्या अध्यक्षानी सांगितले. नव्या तंत्रज्ञानाबरोबर युवा पिढी जोडली गेली आहे म्हणूनच हे अप्लिकेशन युवा पिढीस प्रेरणादायी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.तरी जास्तीत जास्त तरुणांनी हे अप्ली केशन डाऊनलोड करावे आणि सभासद व्हावे असे आवाहन रगेडीयन क्लब चे अध्यक्ष आकाश कोरगावकर यांनी केले आहे.
Leave a Reply