
कोल्हापूर :- कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने लोकसहभागातून ‘आम्ही कोल्हापूरी, झाडे घरोघरी’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.दुष्काळाच्या पार्श्वभुमीवर शहरात झाडे लावण्यासाठी शहरवासीयांना मोफत रोपे देण्यात येणार आहेत.प्रत्येक प्रभागात 100 याप्रमाणे शहरात किमान 8 हजार वृक्ष लावण्याचा मानस आहे.नागरिकांनी रोपे घेण्यासाठी येत्या 5 मेपर्यंत महापालिकेच्या गांधी मैदान, शिवाजी मार्केट, राजरामपुरी व ताराराणी मार्केट विभागीय कार्यालयात नवनोंदणी करावी.कोणती रोपे हवी ते सांगून त्यांना 11 जूनला रोपे दिली जातील, अशी माहिती आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. या वृक्षारोपण उपक्रमासाठी महापालिकेने 3 लाखांचा निधी उपलब्ध केला आहे.त्याअंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. शहरातील पर्यावरण तज्ज्ञांबरोबर आ.पाटील यांनी बैठकीत चर्चा केली.आणि लोकांनी यात पुढाकार घेणे गरजेचे आहे असा सुर बैठकीत निघाला. तरी ज्याना रोपे हवी आहेत त्यांनी घ्यावीत आणि आपल्या परिसरात आसपास अंगणात लावावित पण त्याचे योग्य संगोपन होणे गरजेचे आहे यासाठी रोपांसोबत माहिती दिली जाणार आहे. जेणेकरून त्यांची निगा राखली जाईल. त्यानुसार करंज, लिंब, बहावा, शिरीष, सिसव, मोह, आवळा, सिताअशोक, बकूळ, जांभूळ, करंबळ, जारुळ, टेंभूर्णे, कवट, आपटा, सात्विन आदि झाडांची रोपे दिली जाणार आहेत.
यावेळी आयुक्त पी. शिव शंकर,महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला मुरलीधर जाधव,उदय गायकवाड, यांच्यासह नगरसेवक महापालिका कर्मचारी उपस्थित होते.
Leave a Reply