
कोल्हापूर : शहरातील अस्वच्छ व्यवसायात काम करणाऱ्या कामगारांच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती तात्काळ मिळावी यासाठी लागणारे दाखले प्रभाग अधिकाऱ्यांमार्फत तात्काळ उपलब्ध करुन देऊन येत्या आठ दिवसात हा प्रश्न मार्गी लावावा असे निर्देश महाराष्ट्र विधान मंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीचे प्रमुख आमदार डॉ. सुरेश खाडे यांनी दिले.
महाराष्ट्र विधान मंडळाच्या अनुसूचित जाती कल्याण समितीने कोल्हापूर महानगरपालिकेतील अनुसूचित जातीच्या अधिकारी/कर्मचारी भरती, बढती, आरक्षण व अनुशेष तसेच विशेष घटक योजनेंतर्गंत महापालिकेने राबविलेल्या विविध कल्याणकारी योजनांबाबत आढावा घेतला. या बैठकीस समिती प्रमुख आमदार डॉ. सुरेश खाडे यांच्यासह समिती सदस्य आमदार सर्वश्री डॉ. सुचित मिणचेकर, रमेश बुंदिले, प्रकाश गजभिये, ऍ़ड. जयदेव गायकवाड आदि समिती सदस्यांसह उपसचिव श्रीकांत शेटे, अवर सचिव प्रकाशचंद्र खोंदले, प्रविण लावंड आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी समितीप्रमुखांचे आणि सदस्यांचे स्वागत केले. या बैठकीस सर्व खातेप्रमुख उपस्थित ह
Leave a Reply