
कोल्हापूर : सीपीआर रुग्णालयाचा कारभार सुधारत आहे. अधिक सक्षमतेने रुग्णालय चालविण्यासाठी आवश्यक साधनसामग्रीची यादी करा, कार्पोरेट कंपन्यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून त्यासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल, आपल्या आडचणी मोकळेपणांनी मांडा, सीपीआर हे खुप जुने रुग्णालय आहे. त्यामुळे ते समन्वयाने चालवा, आपले संपुर्ण कौशल्य पणाला लावून रुग्णाची सेवा करा, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राजर्षि छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्व विभागप्रमुखांना केले.
राजर्षि छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता कार्यालयात सीपीआर हॉस्पिटल अभ्यागत समितीची बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली यावेळी जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, आमदार राजेश क्षिरसागर, आमदार अमल महाडिक, अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एल. एस. पाटील, महेश जाधव यांच्यासह अभ्यागत समितीच्या सदस्यांची उपस्थिती होती.
सीपीआर रुग्णालय आवारातील अतिक्रमणांबाबत एक महिन्यात निर्णय घ्या असे सांगून पालकमंत्री पाटील यांनी शेंडा पार्क येथील रुग्णालयाची संरक्षक भिंत, सीपीआर रुग्णालयातील ह्रदय शस्त्रक्रिया विभाग, राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत होणाऱ्या शस्त्रक्रिया, रिक्त पदे, रुग्णालय परिसरातील सुरक्षा व्यवस्थेत वाढ अदी विषयांवर पालकमंत्री पाटील यांनी यावेळी चर्चा केली.
Leave a Reply