
कोल्हापूर : माझी आमदारकी ही शेवटची आमदारकी अशी टिका कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी एका सभेत केली.हे बालिश वक्तव्य असून माझी आमदारकी ही जनतेनेच ठरविली आहे. असे प्रत्युत्तर आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिले.माझी आमदारकी ही शेवटची ठरविणारे दादा सध्या सत्तेच्या नशेत आहेत.तसेच ते त्यांच्याच स्वप्नात रमलेले आहेत.प्रत्येकवेळी अधिकाधिक मताधिक्य देऊन जनतेने माझ्यावर विश्वास दर्शविला आहे.सतत भ्रष्टाचार आणि घोटाळे यांच्या विरोधात आवाज उठवून नागरिकांना न्याय मिळवून दिला आहे.स्वतःला दादा म्हणवून घेण्यासाठी त्यांनी या महापालिका निवडणुकीत गुंड,मटकेवाले गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना उमेदवारी दिली आहे.भाजपच्या सात पिढ्या गेल्या तरी शिवसेनेला संपवू शकत नाहीत.असा उपहासात्मक टोलाही क्षीरसागर यांनी लगावला.या पुढेही जनता माझ्यावरचा विश्वास कमी होऊ देणार नाही.असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.प्रचाराच्या सांगता सभेत ते बोलत होते.
Leave a Reply