कोल्हापूर :-कोल्हापूर महानगरपालिका अंतर्गत एकात्मिक रस्ते विकास प्रकल्प अंतर्गत विकसित झालेल्या तावडे हॉटेल- ताराराणी पुतळा-व्हिनस कॉर्नर-चिमासाहेब चौक ते शिवाजी या रस्त्यावरील अतिक्रमण काढणेची विशेष मोहिम आज पार पडली. या मोहिमेमध्ये 68 विनापरवाना केबीन्स, 22 शेडस् जे.सी.बी.च्या साहय्याने हटविण्यात आले. विभागीय कार्यालय क्र.2 शिवाजी मार्केट व विभागीय कार्यालय क्र.4 ताराराणी मार्केट यांच्या संयुक्त विद्यमाने ही अतिक्रमण मोहिम राबविण्यात आली.
यामध्ये तावडे हॉटेल चौकातील अनधिकृत केबीन्स, शेडस्, वाळू अड्डा, लिशा हॉटेल चौक, रेल्वे स्टेशन रोड लगत असलेल्या केबीन्स, दसरा चौक ते सीपीआर चौक रस्त्यावरील विनापरवाना केबीन्स हटविण्यात आल्या.
सदरची कारवाई आयुक्त पी.शिवशंकर व अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांचे मार्गदर्शनाखाली शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, चारही विभागीय कार्यालयाकडील उपशहर अभियंता, इस्टेट विभाग, अतिक्रमण विभाग, अग्निशमन विभा, शाहूपुरी व लक्ष्मीपुरी ठाणेकडील पोलिस यांचेमार्फत पार पाडण्यात आली.
सदरची अतिक्रमण मोहिम आणखी दोन दिवस चालू राहणार असून आज शिवाजी विद्यापीठ ते पोलिस अधिक्षक कार्यालय या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात येणार आहे. तसेच श्ुक्रवार दि.13 मे रोजी सायबर चौक ते इंदिरा सागर हॉल, संभाजीनगर एस.टी.स्टॅण्ड परिसरातील अतिक्रमण काढण्यात येणार आहे. तरी आय.आर.बी.रस्तेवर अतिक्रमण संबधीतांनी स्वत:हून काढून घ्यावे महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply