
कोल्हापूर – कोल्हापूर महापालिका व सतेज डी.पाटील फौंडेशन यांचे संयुक्त विद्यमाने आज केशवराव भोसले नाट्यगृह येथे रेन वॉटर हार्वेस्टींग विषयी प्रबोधनात्मक कार्यशाळा मोठया उत्साहात संपन्न झाली. महापौर सौ.अश्विनी रामाणे व आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करुन कार्यशाळेचा शुभारंभ करण्यात आला.
प्रास्ताविकात उपायुक्त विजय खोराटे यांनी पावसाचे प्रमाण कमी होत असून पाणी बचत करणे गरजेचे आहे. याकरिता उपलब्ध पाण्याचा चांगल्या पध्दतीने वापर करणेसाठी रेन वॉटर हार्वेस्टिंग उपयुक्त आहे असे सांगितले.
महापौर सौ.अश्विनी रामाणे बोलताना शहरास पाणी पुरवठ्यासाठी उपयोगी असलेले राधानगरी व काळम्मावाडी धरणाची पाणी पातळीही मोठ्या प्रमाणत खालावली त्यामुळे शहरात एक दिवस आड पाणी पुरवठ्याचे नियोजन 1 एप्रिल, 2016 पासून सुरू करणेत आले.भविष्यात अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे सुयोग्य पध्दतीने नियोजन करणे ही काळाची गरज आहे. यासाठी पावसाचा प्रत्येक थेंब वाचविण्याचा संकल्प आपण करुया असे सांगीतले.
आ.सतेज पाटील यांनी बोलताना शहरामध्ये रेन वॉटर हार्वेस्टींग हा प्रोजेक्ट राबविण्यासाठी महानगरपालिका व सतेज पाटील फौंडेशन मिळून नियोजन करु. यासाठी वेगवेगळया संस्थेच्या माध्यमातून येत्या 15 दिवसात याबाबतचे नियोजन करु असे सांगितले. ज्याप्रमाणे प्रत्येक प्रभागात 100 झाडे लावण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. त्याच पध्दतीने प्रत्येक प्रभागात 50 घरामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग करणेचा आमचा मानस आहे. यासाठी पहिला प्रयोग आजच माझ्या घरापासून करणार आहे असे सांगून शहरामध्ये तज्ञ लोकांच्याकडून आराखडा तयार करण्यात येईल
Leave a Reply