
कोल्हापूर : कोल्हापूरच्या गझल प्रेमींसाठी सुमधुर आणि सुश्राव्य अशा सुरमयी श्याम या गझल मैफिलीचे आयोजन येत्या रविवारी २२ मे रोजी सायंकाळी ६.३० वाजता शाहू स्मारक भवन येथे करण्यात आले आहे असे कलाप्रेमी नितीन गोंधळी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.संगीत मैफिलींमध्ये भावगीत,भक्तिगीते,अभंग सर्रास गायले जातात.पण रसिकांच्या पसंतीच्या गझलांच्या कार्यक्रमाचे खास असे आयोजन केले जात नाही.गझल ऐकणारा वेगळाच श्रोता वर्ग आहे.यासाठीच अशा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे असे नरेंद्र पाटील यांनी सांगितले.मैफिलीत एकूण २० अनोख्या गझल यांची प्रस्तुती झी सारेगम फेम प्रल्हाद जाधव करणार असून याला अनुभवी आणि कुशल वादकांची साथसंगत असणार आहे.या कार्यक्रमासाठी मुंबई येथील की-बोर्ड वादक प्रसाद रानडे,तबला वादक मनीष मदनकर तसेच कोल्हापूरचे व्हायोलिनवादक केदार गुळवणी,ढोलक वादक नरेंद्र पाटील,महेश कदम यांची साथसंगत असणार आहे.निवेदन महेंद्र कुलकर्णी करणार असून या गझल मैफिलीस प्रवेश विनामुल्य असणार असून याचा लाभ कोल्हापूरच्या रसिकांनी घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Leave a Reply