कोल्हापूर: भारतात स्थापन होऊन जगभर विस्तारलेल्या आंतरराष्ट्रीय सेवाभावी संस्था जायंट्स इंटरनशनल सलंग्न असलेल्या जायंट्स ग्रुप ऑफ रंकाळा चौपाटीच्या वतीने येत्या रविवारी २९ मे रोजी कोल्हापुरात सर्व धर्मीय आणि सर्व जातीय तसेच आंतरजातीय व्यापक असा वधु-वर मेळावा आणि पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती जायंट्स फेडरेशन २ च्या संचालिका सौ.बबिता दिलीप जाधव आणि जायंट्स ग्रुप ऑफ रंकाळा चौपाटीच्या अध्यक्षा सौ.शारदा शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शनिवार पेठ येथील बुरुड गल्ली मधील शिव मल्हार मल्टीपर्पज हाल येथे २९ मे रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होणाऱ्या या अभिनव मेळाव्यात कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभरातून इच्छुक सहभागी होणार आहेत.मेळाव्यात विधवा,विधुर,घटस्पोटीत यांचीही नोंद केली जाणार आहे तसेच सर्व जाती आणि सर्व धर्मातल्या वधु वरांच्या मेळाव्यात लग्ने जुळणाऱ्या जोडप्यांसाठी सामुदायिक पद्धतीने मोफत विवाह आयोजित करण्यात येणार आहे.जायंट्सच्या वतीने आजवर अनेक सामजिक उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत.त्या त्या जातीनुसार आणि धर्मानुसार त्यांचे विवाह करून देण्यात येणार आहेत.असा अनोखा विवाह सोहळा प्रथमच कोल्हापुरात आयोजित केला आहे असे संचालक विजय विभूते यांनी सांगितले.तरी या मेळाव्याचा लाभ घेण्याचे आवाहन जायंट्स ग्रुप ऑफ रंकाळा चौपाटीच्या वतीने करण्यात आले आहे.पत्रकार परिषदेला प्रमोद शहा,सुनंदा मोरे,दिलीप जाधव,शुभदा कामत उपस्थित होते.

Leave a Reply