शाहू विचार मंचच्यावतीने येत्या २६ मे रोजी अग्निदिव्य नाटकाचा प्रयोग

 

IMG_20160522_123333कोल्हापूर: कोल्हापूरचे भाग्यविधाते असणाऱ्या लोकराजा राजर्षी शाहू यांच्या दूरदृष्टीच्या कार्यामुळेच आज कोल्हापूरकर सर्वात सुखी समाधानी आणि समृद्ध आहे.पण दुर्दैवाने त्यांच्या कार्याचा विसर लोकांना पडत चालला आहे.म्हणूनच शाहू महाराजांच्या विचाराचा वारसा जपला जावा म्हणून लोकराजा राजर्षी शाहूप्रेमी विचार मंचची स्थापना करण्यात आली.याच्या माध्यमातून शाहुच्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.

याचाच एक भाग म्हणून २६ मे ते २६ जून हा कालावधी राजर्षी शाहू विचार महिना म्हणून साजरा करण्यात येणार आहे.यामध्ये पहिल्या टप्प्यात २६ मे रोजी राजर्षी शाहू आणि लोकमान्य टिळक यांच्या विचार संघर्षावर प्रकाशझोत टाकणाऱ्या अग्निदिव्य या दोन अंकी नाटकाचे सादरीकरण करण्यात येणार आहे.हा प्रयोग केशवराव भोसले नाट्यगृह येथे सायंकाळी ७ वाजता होणार आहे अशी माहिती संयोजक बाबा महाडिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

श्री हनुमान तरुण मंडळाने सादर केलेल्या अग्निदिव्य या नाटकाची निर्मिती सुनील माने यांची असून अशोक पाटोळे यांनी हे नाटक लिहिले आहे.अनेक स्थानिक कलाकारांच्या दमदार अभिनयाने हे नाटक परिपूर्ण आहे.शाहूंच्या विचारांचा प्रसार होण्यासाठी हे नाटक पाहणे जरुरी आहे तरी याचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे उपाध्यक्ष हिंदुराव हुजरे यांनी सांगितले.पत्रकार परिषदेला दिग्दर्शक प्रकाश पाटील यांच्यासह कलाकार आणि शाहूप्रेमी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!