
कोल्हापूर – बारावीचा निकाल जाहीर झाला असून कोल्हापूर विभागाचा 88.10 टक्के निकाल लागला आहे.मागील वर्षाच्या तुलनेत निकाल घटला.यंदा निकाल ४.५ टक्क्यांनी घटला राज्याचा एकूण निकाल ८६.६० टक्के निकल लागला आहे.
मुलींचा निकाल ९०.५० टक्के असल्याने यंदाही मुलींची बाजी आहे,कोकण विभागाची बारावीच्या निकालात बाजी असून कोकण विभागाचा 93.29 टक्के निकाल असून सर्वांत कमी निकाल नाशिक विभागाचा म्हणजे 83.99 टक्के निकाल लागला आहे.पुण्याचा निकाल ८७.२६ टक्के विज्ञान शाखेचा निकाल सर्वाधिक असून विज्ञान शाखेचा निकाल ९३.१६ टक्के, कला शाखा 78.11 वाणिज्य शाखा 79.10 आणि व्यवसाय अभ्यासक्रम चा 81.68 टक्के निकाल आहे.नागपूर विभागाचा निकाल ८६.३५ टक्के लातूर विभागाचा निकाल ८६.२८ टक्के औरंगाबाद विभागाचा निकाल ८७.८० टक्के कोल्हापूर विभागाचा निकाल ८८.१० टक्के लागला आहे.3 जून रोजी दुपारी 3 वाजता त्या त्या कनिष्ठ महाविद्यालयात विद्यर्थ्याना गुण पत्रिका वाटप करण्यात येईल.मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण मूलंपेक्षा 12 टक्के अधिक आहे.
Leave a Reply