
मुंबई : स्वामी जगद्गुरु शंकराचार्य पीठाच्या कोल्हापूर शहरातील केसापूर पेठ येथील देवस्थान जमिनीस सध्याच्या सोन्याच्या आधारभूत किमतीप्रमाणे भाडेवाढ देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्वत: मान्यता दिली आहे.
आज मंत्रालयात कोल्हापूर शहरातील केसापूर येथील देवस्थान जमिनीची भाडेवाढ मिळण्याबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी महसूलमंत्री एकनाथ खडसे, सहकारमंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील,आमदार अमल महाडीक, श्रीमती शोभाताई फडणवीस, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर,महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी,कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर, कोल्हापूर स्वामी जगद्गुरू शंकराचार्य पीठाचे सचिव शिवस्वरूप चंद्रकांत भेंडे आदी मान्यवर उपस्थित होते.
केसापूर पेठ येथील जमिनीचा मोबदला म्हणून 1874 ते 2001 पर्यंत प्रतिवर्षी 186 रुपये 70 पैसे इतकी रक्कम देण्यात आली आहे. त्यानंतरची2001 ते 2016 पर्यंतची थकबाकी रक्कम सध्याच्या सोन्याच्या आधारभूत किमतीप्रमाणे आणि नवीन नियमाप्रमाणे भाडेवाढ देण्यासंदर्भातील प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर ठेवून त्याला लवकरच मान्यता देण्यात येईल, असेही मुख्यमंत्र यांनी यावेळी सांगीतले
Leave a Reply