अबकारी करावर उपायासाठी दिल्लीत बैठक भरत ओसवाल निमंत्रित

 

कोल्हापूर:सराफ व्यवसायाला लागू केलेल्या एक टक्का करावर उपाय सुचविण्यासाठीIMG_20160601_225256 दिल्ली येथे उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले आहे. त्यासाठी महाराष्ट्रातून कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांच्यासह आणखी दोघांना आमंत्रित केले आहे.केंद्रीय अर्थसंकल्पात सोन्यावर एक टक्का अबकारी लागू केल्याच्या निषेधार्थ दोन मार्चपासून सराफी दुकाने बंद ठेवण्यात आली. दुकाने बंद ठेवून विविध मार्गाने आंदोलन करून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी 42 दिवस दुकाने बंद होती. दुसऱ्या बाजूला केंद्र सरकार बंदच्या पहिल्या दिवसापासून अबकारी कर मागे न घेण्याच्या भूमिकेवर ठाम होते. याचबरोबर अर्थमंत्री अरुण जेटली, पियूष गोयल आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याबरोबर वेळोवेळी आयोजित केलेल्या बैठकांमध्ये अबकारी करापासून आपणाला त्रास होणार नाही. पारंपरिक नियम आणि अटी यामध्ये शिथिलता आणून याचे कायद्यात रूपांतर करू, असे आश्वासन दिले होते.

दरम्यान, अबकारी करावर उपायासाठी केंद्र सरकारने दिल्ली येथे या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि व्यापाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक आयोजित केली आहे. त्याला देशभरातून निवडक सराफ व्यावसायिक उपस्थित राहणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातून तीन सराफ व्यावसायिकांना आमंत्रित केले आहे. कोल्हापूर जिल्हा सराफ संघाचे अध्यक्ष भरत ओसवाल यांच्यासह दिलीप लागू आणि राजेश राठोड असे आणखी दोन सदस्य आहेत. त्यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी एक तास देण्यात येणार आहे. यावेळी अबकारी करामुळे येणाऱ्या अडचणी, समस्या ते समितीसमोर सादर करतील. यासाठी भरत ओसवाल यांनी सात मिनिटांचा एक लघुचित्रपट तयार केला आहे. कागदपत्र आणि लघुचित्रपटाच्या माध्यमातून अबकारी कराची माहिती ते देतील. याचबरोबर चार्टर्ड अकौंटंट चेतन ओसवालही या कायद्यात कशा प्रकारे शिथिलता आणता येऊ शकेल, याची माहिती देतील. कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे सचिव कुलदीप गायकवाडही यावेळी उपस्थित राहणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

*


error: Content is protected !!